सुरगाणातील बोरगावजवळील गायदर घाटातील घटना बस दरीत कोसळली, ३ ठार,२२जखमी

नाशिक : नाशिक जिह्यातील सुरगाणा तालुक्यातील बोरगावजवळील गायदर घाटात खाजगी लक्झरी बस दरीत कोसळून ३ जण ठार झाले असून २२ प्रवासी जखमी झालेत. मृतांमध्ये २ महिला आणि एका बालकाचा समावेश आहे. बुधवारी पहाटे तीन वाजता सदरचा अपघात झाला. महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या आणि सापुतारापासून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या गायदरी घाटात ही कोसळली. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला असल्याचे समजते. बसमधील प्रवासी गुजरातमधील नवसारी आणि सुरतचे रहिवासी आहे. वणी येथील सप्तश्रृंगीगडावरील देवीच्या दर्शनासाठी ते सुरतहून महाराष्ट्रात येत असतानाच हा अपघात घडला.least 3 killed 22 others injured bus Accident Gadar Ghat Surgana

याबाबत अधिक माहिती अशी, नवसारी येथून निघालेली ही बस सप्तश्रृंगीगडावरील देवीच्या दर्शन  आणि शिर्डीला जात होती. यावेळी उंबरपाडा येथील चेकपोस्ट वरील टोल वाचवण्यासाठी चालकाने बसचा मार्ग बदलला होता. गायदर घाटत आल्यानंतर चालकाचा बसवरील ताबा सुटल्‍याने बस रस्‍ता सोडून घाटात कोसळली.  जखमींवर महाराष्ट्र व गुजरातच्या सीमेवर असलेल्या बोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर काही जखमींना आहवा- डांग येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Advertise With us, Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi,Your Name, City  or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! NashikOnWeb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.