Dawood : देशद्रोही दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नात नेते आणि पोलिस ?

दावूदच्या नातेवाईकाच्या लग्नात अनेक पोलिस अधिकारी आणि नेतेमंडळी… सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

नुकत्याच नाशिकमध्ये पार पडलेल्या एका  मोठ्या लग्न सोहळ्याबद्दल खळबळजनक खुलासा समोर येत आहे. सदरचे लग्न हे देशद्रोही कुविख्यात गुंड, १९९३ बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी दावूद याच्या नातेवाईकाचे होते. विशेष म्हणजे या लग्न सोहळ्याला शहरातील पोलिस अधिकारी, प्रतिष्ठित आणि अनेक बडे नेते हजर होते. आता या संपूर्ण प्रकरणात चौकशीचे आदेश पोलिस आयुक्तांनी दिले आहेत.

एक आठवड्या पूर्वी एक मोठा लग्न सोहळा पार पडला. हा सोहळा दावूदच्या नातेवाईकाचा होता. याबाबतचा एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली सोबतच अनेक गोष्टी यापोस्ट मधून समोर आल्या. व्हॉटस अपर माहितीसोबत हा प्रकार फिरला आहे. यामध्ये मुलीच्या लग्नात अनेक पोलिस अधिकारी हजर होते. तर देशातून अनेक बुकीज सुद्धा लग्नाला हजर झाले होते. गॅंग स्टर, अनेक पोलिस उपआयुक्त, असिस्टंस पोलिस ऑफिसर, एक सिनिअर पोलिस  निरीक्षक, एक पोलिस उपनिरीक्षक, तर शहर पोलिस आयुक्तालयातील निगडित ऑफिसर या लग्नाला हजेरी लावली. हा सर्व प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि सर्व गोष्टी समोर आल्या आहेत.

मात्र दुसऱ्या बाजूस नाशिक पोलीस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल यांनी ही बाब गंभीरतेने घेतली आहे. याबाबत चौकशी सुरु केली असून कोणी कोणी या लग्न सोहळ्याला हजेरी लावली हे तपासले जात आहे.

व्हाट्सअँप वर याबाबत एक पोस्ट फिरत असून यामध्ये दाऊदच्या एका नातेवाईकांच्या मुलीचा विवाह कसा होता आणि कसे राजकीय नेते येथे हजर होते याबाबत विवरण दिले आहे. कुख्यात गुंडासोबत कसे पोलिस आणि इतर नेते मंडळी वावरत होती याची माहिती आहे. लवकरच अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहेत.

पोलिस आयुक्तांनी याबात चौकशी सुरु असल्याचे सांगितले आहे. कोण अधिकारी होते त्यांचे जबाब नोंदवले जात आहेत. तर यासर्व चौकशी अंती एक डिटेल रिपोर्ट तयार केला जाणार आहे. यात चौकशी कशी ही असो मात्र यामुळे पोलिस दलात आणि नेते मंडळीत खळबळ उडाली आहे.

आम्ही त्या सर्व पोलिस  अधिकारी आणि त्यांचे सर्वांचे जबाब नोंदवत आहोत.प्रथमदर्शनी असे समोर येतंय की त्यांना लग्नाचे आमंत्रण एका बड्या माणसाकडून आले होते. मात्र पोलिस अधिकारी वर्गाला नेमके हे कोण आहेत याची माहिती नव्हतं की ते दावूद चे नातेवाईक आहेत.आम्ही पूर्ण चौकशी करत आहोत. सर्व सत्य बाहेर येणार आहे

–  पोलिस आयुक्त रविंद्र कुमार सिंगल नाशिक शहर पोलिस

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.