रांगोळीतून छत्रपती शिवराय, गिनिज बुकात होईल नोंद

सर्व नियम आणि परिमाणांचे पालन, ४६ जणांच्या प्रयत्नातून जागतिक महा कलाविष्कारLatur Shiv Chatrapati Sivaji Maharaj Ranjoli world record

लातूर: लातुरच्या क्रीडा संकुलावर साकारण्यात येणार्‍या शिवरायांच्या रांगोळीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. अनेक शाळांचे विद्यार्थी येथे भेट देऊन हा कलाविष्कार डोळ्यात साठवत आहे. ही रांगोळी विश्वविक्रमी घडणार असल्याने गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने याची दखल घेतली आहे. गिनिज बुकातील नोंदणीसाठी घालून दिलेले सर्व नियम आणि परिमाणांचं पालन केलं जात आहे. नोंदीसाठी या कलाकृतीची सर्वांगाने माहिती जमवून ती पाठवली जाणार आहे अशी माहिती अ‍ॅड. ज्ञानेश्वर चेवले यांनी दिली.Latur Shiv Chatrapati Sivaji Maharaj Ranjoli world record

दहा दिवसांपूर्वीच याबाबत गिनिज बुक समितीशी संपर्क साधण्यात आला. त्यांना आवश्यक असणारे रेकॉर्ड पाठवले जात आहे. त्यानुसार या कलाकृतीची गिनिज बुकात नक्कीच नोंद होईल. जगातील सर्वात मोठ्या कलाकृतीचा आनंद सर्वांनी घ्यावा असे आवाहन ज्ञानेश्वर चेवले यांनी शिवमहोत्सव समिती आणि अक्का फाऊंडेशनच्या वतीने केले आहे. अडीच एकरावरील या कलाकृतीसाठी ५० हजार किलो रांगोळी वापरण्यात आली आहे. २५ कलावंत आणि २० स्वयंसेवकांनी यावर मेहेनत घेतली आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.