स्मृतीदिन कार्यक्रम : भाजपाच्या उभारणीत बंडोपंत जोशींचे योगदान मोलाचे

स्मृतीदिन कार्यक्रमात मान्यवरांकडून आठवणींना उजाळा.

नाशिक- भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, मार्गदर्शक आणि माजी सभागृह नेते प्रभाकर शंकर उर्फ बंडोपंत जोशी यांचा स्मृतीदिन महानगर भाजपा कार्यालयात संघ परिवाराचे ज्येष्ठ नेते अभय छल्लाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते बंडोपंतांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले .Late bandopant Joshi work hard built BJP party Nashik 

 व्यासपीठावर मध्य-पश्चिम मंडलाचे अध्यक्ष आणि बंडोपंत जोशी यांचे चिरंजीव देवदत्त जोशी, सुजाता करजगीकर, भारती बागुल, नगरसेविका स्वाती भामरे, हेमंत शुक्ल, नंदू देसाई, सोनल दगडे आदी होते. महानगर भाजपाच्या उभारणीत आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण करण्यात बंडोपंतांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी सतत कार्यकर्त्यांचा सन्मान बाळगून त्यांना मोठे करण्याचा प्रयत्न केला.ज्या काळात भाजपात येण्यास कुणी धजावत नव्हते अशा  काळात पक्षाची विचारधारा पटवून देवून कार्यकर्त्यांना पक्षात आणण्यास त्यांनी आपले सर्वस्व पणास लावले.

आज पक्षाचा मोठ्याप्रमाणात जो विस्तार झाला आहे त्याचे श्रेय बंडोपंतांच्या शिस्तबद्ध नियोजननितीलाच द्यावे लागेल हे निर्विवाद सत्य आहे. त्यामुळेच त्यांच्याबद्दलच्या आठवणी सांगताना अनेकांना गहिवरून आले होते तर काहींनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली होती. प्रथम आपल्या पायावर उभे राहा आणि नंतर राजकारणात पडा असा सल्ला देत त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. पक्षात प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना त्यांनी मानाची पदे भूषविण्याची संधी दिली.

सहकार, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रातही त्यांनी अनेकांना मोठे केले. सहकारी बँकांचे अध्यक्ष आणि संचालक पदे तसेच विविध सामाजिक संघटनांवर कामकरण्याची संधीही त्यांच्यामुळे अनेकांना प्राप्त झाली असे सांगताना त्यांच्याबरोबरचे अनुभव कथन अभय छल्लाणी, हेमंत शुक्ल, अरुण शेंदुर्णीकर,  सुजाता करजगीकर, भारती बागुल, स्वाती भामरे, सोनल दगडे, उदय रत्नपारखी, देवदत्त जोशी, राजेंद्र महाले आदींनी सदर केले.

यावेळी महानगर सरचिटणीस पवन भगुरकर, शैलेश जुन्नरे, वसंत उशिर, प्रदिप पाटील, विनायक कस्तुरे,विस्तारक राम बडोदे, प्रतिक शुक्ल, धनंजय पळसेकर, फिरोज शेख आदी उपस्थित होते.

Late bandopant Joshi work hard built BJP party Nashik

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.