लासलगाव : विंचूर जवळ झालेल्या शिवशाही बसच्या अपघातात एक ठार, २० जखमी

लासलगाव (वार्ताहर) समीर पठाण

लासलगाव : नाशिक औरंगाबाद रस्त्यावरील विंचूर एमआयडीसी जवळ झालेल्या शिवशाही बसच्या अपघातात एक ठार तर २० प्रवासी जखमी झाल्याची घटना शनिवार (दि. १५) दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली आहे. lasalgaon vinchur shivshahi bus accident 1dead diesel tanker nashik aurangabad

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, नाशिकहून औरंगाबादकडे जाणारी शिवशाही बस (क्रमांक एमएच ०४ जेके २८४४) विंचूर एमआयडीसी जवळ अपघात होऊन पलटी झाली. नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या डिझेल टँकर (क्रमांक एमएच ०४ जीसी ९०७७) चा टायर फुटल्याने शिवशाही बसला जोरदार धक्का लागला. त्यामुळे बस उलटली. या अपघातात शिवशाहीचे मोठे नुकसान झाले आहे. lasalgaon vinchur shivshahi bus accident 1dead diesel tanker nashik aurangabad

lasalgaon vinchur shivshahi bus accident 1 dead diesel tanker nashik aurangabad

या अपघातात शिवशाहीतील एक प्रवासी जागीच ठार झाला आहे तर २० जण जखमी झाले असून ७ रुग्णांना जिल्हा रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) नाशिक येथे तसेच ४ रुग्णांना निफाडच्या उपजिल्हा रुग्णालय येथे तर ९ रुग्णांना लासलगाव व निफाडच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अंदाजे ५० प्रवासी या शिवशाहीत प्रवास करत होते.

हरि ठाकरे (वय, ४५, रा.औरंगाबाद) असे या अपघातात मृत झालेल्या प्रवाशाचे नाव आहे  तर जखमी झालेल्यांमध्ये एक ५० वर्षीय अनोळखी महिला, शारदा शिवनाथ यादव (वय ४६, नवनाथ नगर, अंबड नाशिक), शेषनाथ यादव (वय ५३ अंबड नाशिक), बाळू भिकाजी साळुंखे (रा. विंचूर), लक्ष्मण सावंत बोरसे (औरंगाबाद), निशांत शशिकांत पाटील (वय ३०, रा. निफाड), शेखर देसाई (लासलगाव), उत्तम दगू जाधव (वय ६२ रा. पिंपळगाव बसवंत), रूपसिंग राजपुरोहित (रा. विंचूर), अमोल बबन वाघ (रा. पिंपळद, ता. नाशिक), मयूर गरिबे (वय ३०, औरंगाबाद), वैशाली घोडके (रा. पिंपळगाव), परसराम जाधव, आशाबाई गुलाब गोटे (नाशिक), मिनू बाई उत्तम गोटे (नाशिक), सागर अनिल साठे (रा कुसमाड़ी), अनुराधा पाटील (नाशिक) हे गंभीर जखमी झाले आहेत. lasalgaon vinchur shivshahi bus accident 1dead diesel tanker nashik aurangabad

या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती मात्र क्रेनचा वापर करून दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला करण्यात आली. उलट पडलेली शिवशाही देखील सरळ करण्यात येऊन जखमींना बाहेर काढण्यात आले.

lasalgaon vinchur shivshahi bus accident 1dead diesel tanker nashik aurangabad

lasalgaon vinchur shivshahi bus accident 1dead diesel tanker nashik aurangabad
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.