लासलगाव : स्वरांजली संगीत संकुलाच्या वतीने गुरुवंदना स्वरोत्सव उत्साहात

लासलगाव (वार्ताहर) समीर पठाण :

लासलगाव येथील स्वरांजली संगीत संकुलाच्या वतीने गुरुवंदना स्वरोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्राचार्य पंडित मकरंद हिंगणे या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षपदी होते तर प्रमुख पाहुणे कुसूमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त विनायक रानडे, व्हायोलिन वादक अनिल दैठणकर, जि. प. सद्स्य डी .के. जगताप, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर, प्रकाश दायमा, प.स. सदस्य शिवा सुरासे, प्रा.शिरीष गंधे, सुवर्णाताई जगताप, वेदिकाताई होळकर, आदी उपस्थित होते. lasalgaon swaranjali sangit sankul guruvandana swarotsav concluded

मकरंद हिंगणे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी संगीत विषयाची जिद्द, ध्यास आणि सातत्य आपल्या साधनेत ठेवायला हवे. स्वरांजली संगीत संकुलाच्या पंच दशवर्षपूर्ती आणि गुरुवंदना या स्वरोत्सवात विनायक रानडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मकरंद हिंगणे यांच्या गायनाने श्रोतावर्ग मंत्रमुग्ध झाले.

अनिल दैठणकर यांचे व्हायोलिन वादन आणि वैष्णवी जोशी हिच्या बासरी वादनाने उपस्थितांची दाद मिळवली. स्वरांजली संगीत संकुलाच्या स्नातकांनी राग देस, यमन, जौनपुरीचे यांचे सादरीकरण केले. तसेच शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीत तसेच सुगम संगीतातील भक्तीगीते, भावगीते, हिंदी, मराठी चित्रपट गीते सादर केली. lasalgaon swaranjali sangit sankul guruvandana swarotsav concluded

याप्रसंगी स्वरांजली संगीता संकुलाच्या विद्यार्थ्यांना संकुलाच्या वतीने शिष्यवृत्ती देण्यात आली. तसेच बक्षीस वाटप करण्यात आले. संगीत शिक्षणासाठी प्रोत्साहन देणाऱ्या पालकांचाही सन्मान यावेळी संकुलाच्या वतीने करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वरांजली संगीत संकुलाच्या संस्थापिका, अध्यक्षा सुवर्णा क्षीरसागर यांनी केले. तर सूत्रसंचालन सौ सीमा कुलकर्णी व गायत्री जोशी यांनी केले.

lasalgaon swaranjali sangit sankul guruvandana swarotsav concluded
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.