लासलगावी हॉस्पिटलच्या मेडिकलमध्ये चोरी, वृद्धेला धमकावत दीड लाखाची रोख घेऊन पोबारा

लासलगाव (वार्ताहर) समीर पठाण :

येथील आशीर्वाद हॉस्पिटललगतच्या आशीर्वाद मेडिकलमध्ये चोरट्यांनी एक लाख 95 हजार रुपयांच्या रोख रक्कमेची धाडसी चोरी करून पोबारा केला आहे. याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोन पथके तयार करून चोरीच्या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे लासलगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  Lasalgaon robbery hospital attached medical onehalf lakh cash stolen

या बाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, लासलगाव येथील विद्या नगरमध्ये डॉक्टर किरण निकम यांचे असलेले आशीर्वाद हॉस्पिटल लगत आशीर्वाद मेडिकल येथे शनिवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास अज्ञात चार चोरट्यांनी लाल रंगाच्या गाडीतुन येत मेडिकलचे शटर चे कुलूप त्यांच्याकडे असलेल्या कटावणी च्या साह्याने तोडून आत प्रवेश केला. आणि ड्रावरमध्ये हॉस्पिटल, मेडिकलचे दोन तीन दिवसाचे व्यवहार व डॉक्टरांनी बाहेरगावी जाणार असल्याने विमा पॉलिसी साठी काही रोख स्वरूपात ठेवलेली अशी एक लाख 95 हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी घेऊन पोबारा केला. Lasalgaon robbery hospital attached medical onehalf lakh cash stolen

Lasalgaon robbery hospital attached medical onehalf lakh cash stolen, लासलगाव चोरी मेडिकल दुकान

या चोरीच्या घटनेदरम्यान डॉक्टर निकम यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रस्तुती विभागाच्या गेट जवळ झोपलेल्या कांताबाई कुरे या महिलेला आवाज केल्यास तुला जिवे ठार मारू अशी ही धमकी या चोरट्यांनी दिली होती. चोरटे चोरी करून गेल्यानंतर कांताबाई यांनी सर्व घटनेची माहिती डॉक्टर किरण निकम यांना दिली.

त्यांनी तातडीने ही सर्व घटना पोलिसांना सांगितले असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करत चोरट्यांचा शोध घेण्यासाठी वरिष्ठांना कळवून संपूर्ण जिल्ह्यात नाकेबंदी केली होती. मात्र हाती काहीच न लागल्याचे दिसत असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरीची घटना कैद झाल्याने या सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत लासलगाव पोलिसांनी दोन पथके तयार करून या चोरांचा शोध सुरू केला आहे. Lasalgaon robbery hospital attached medical onehalf lakh cash stolen

सदर घटनेचा तपास नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संजय दराडे, अप्पर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, निफाड विभागाचे उपअधीक्षक माधव पडिले यांच्या मार्गदर्शन खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, डी एम तनपुरे व पोलीस कर्मचारी करत आहेत.

आम्हाला फेसबुकवर फॉलो करा…

Lasalgaon robbery hospital attached medical onehalf lakh cash stolen
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.