शरियतच्या समर्थनार्थ लासलगाव ला मुस्लिम महिलांचा मूक मोर्चा

Share this with your friends and family

लासलगाव (वार्ताहर समीर पठाण) : केंद्र सरकार कडून लोकसभेत मांडण्यात आलेल्या तिहेरी तलाक विरोधी विधेयक रद्द करण्याच्या मागणी साठी शरियत बचाव कृती समिती लासलगाव शाखेच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी ११ वाजता लासलगाव ईदगाह मैदान येथून मुस्लिम महिलांच्या मोर्चाला प्रारंभ झाला. lasalgaon muslim women supports shariyat muk morcha

बाजार तळ, मेन रोड, पै. महंमद दादा मार्ग ते मंडल अधिकारी कार्यालय येथे मूक मोर्चा काढण्यात आला. “इस्लामी शरियत हमारा सन्मान है,हुकूमते तो आनी जानी है,शरियत हमेशा रहने वाली है…अशा आशयाचे फलक झळकावत लासलगाव व परिसरातील बहुसंख्य मुस्लिम महिलांनी रणरणत्या उन्हात लासलगाव च्या मंडल अधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. lasalgaon muslim women supports shariyat muk morcha

?

तिहेरी तलाक विरोधी विधेयक घटना विरोधी असल्याचे सांगून हे विधेयक रद्द करण्याची मागणी या वेळी लासलगाव चे मंडल अधिकारी चंद्रशेखर नगरकर व सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांना निवेदन देऊन करण्यात आली.

केंद्र शासनाने लोकसभेत तीन तलाक विरोधात कायदा मंजूर केला. या कायद्याविरोधात मुस्लिम समाजातील महिलांमध्ये तीव्र संताप आहे. कायदा करताना मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंना,धर्म पंडीतांना विचारात न घेता तो पारित केला. lasalgaon muslim women supports shariyat muk morcha

हा कायदा संविधान विरोधी तसेच मुस्लिम महिलांच्या विरोधी असल्याचा आरोप या प्रसंगी महिलांकडून व्यक्त करण्यात आला. या मोर्चा दरम्यान लासलगाव चे सहायक पोलिस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डी एम तनपुरे, पोलीस नाईक कैलास महाजन यांनी पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

lasalgaon muslim women supports shariyat muk morcha

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi and your  name and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.