लासलगाव हरित सेनेच्या सदस्यांकडून वृक्षारोपण

लासलगाव (वार्ताहर) समीर पठाण :

येथील श्री दत्त मंदिराच्या परिसरात महाराष्ट्र हरीत सेना,श्रीराम मंदिर ट्रस्ट,श्री दत्त भक्त मंडळ,राजा शिवछत्रपती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विध्यमाने शनिवारी सकाळी ८ वाजता वृक्षारोपण करण्यात आले. Lasalgaon harit sena green army plantation drive

या धकाधकीच्या जिवणात अध्यात्माचे, मंदिरांचे आणि श्रध्दास्थानांचे जितके महत्त्व आहे तितकेच महत्व निसर्गाला सुध्दा आहे. भगवंताच्या दर्शनासाठी जे भाविक जातात त्यांना त्या मंदिराच्या पवित्र वातावरणात प्रवेश करतांना टुमदार झाड आणि फुलझाड पाहुन मन प्रसन्न होणार नाही तर नवलच.

Lasalgaon harit sena green army plantation drive

निसर्गाचे आपण काही देणे लागतो या पवित्र उद्देशाने मंदिराच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणाचे हे दुसरं वर्ष असुन गतवर्षी जुन महिन्यातच वृक्षारोपण करण्यात होते. त्यातील वृक्ष बऱ्या पैकी संवंर्धीत केले असुन या वृक्षारोपणाला आणि वर्षभर वृक्षसंवर्धनाला श्रीराम मंदिर ट्रस्ट,श्री दत्त भक्त मंडळ आणि राजा शिवछत्रपती प्रतिष्ठान तसेच हरीत सेनेचे नियमित सहकार्य असते. Lasalgaon harit sena green army plantation drive

या वर्षी नविन वृक्षांची लागवड करण्यात आली असुन या वृक्षारोपण प्रसंगी लासलगाव ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटील,महाराष्ट्र शासनाच्या हरीत सेनेचे सदस्य पत्रकार समीर पठाण,ऋषिकेश जोशी तसेच नुतन विद्या प्रसारक मंडळाचे सदस्य हसमुखभाई पटेल, डॉ अरुण काळे, राजेंद्र कराड, प्रशांत भुतडा, प्रमोद कुलकर्णी, संदिप दिक्षीत, सचिन गोमासे, रमेशभाई पटेल, पार्थ पाटील उपस्थित होते. Lasalgaon harit sena green army plantation drive

या झाडांच्या संवंर्धणाची आणि नियमित देखभालीची जबाबदारी वनविभागाच्या हरित सेनेचे सदस्य पत्रकार समीर पठाण, ऋषीकेश जोशी ह्यांनी घेतली आहे.

वृक्षलागवड करून झाडे लावा झाडे जगवाचा संदेश या वेळी देण्यात आला. केवळ झाडे लावणे हेच एक उद्दीष्ट डोळ्यासमोर न ठेवता ते झाड जगवण्याचे लक्ष डोळ्यासमोर असणे आवश्यक असून त्या उद्देशानेच हे झाडे लावणे गरजेचे आहे असे हरीत सेनेचे सदस्य ऋषिकेश जोशी यांनी या प्रसंगी सांगितले.

Lasalgaon harit sena green army plantation drive
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.