लासलगाव : नाफेडच्या कांदा खरेदीने बाजारात चैतन्य; बाजारभावात २०० ते २५० रुपयांची वाढ

लासलगाव (वार्ताहर समीर पठाण) : लासलगाव येथील बाजार समितीत नाफेड तर्फे कांदा खरेदीचा शुभारंभ नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांचे उपस्थितीत करण्यात आला. बाजार समितित खरेदी केलेल्या पहिल्या कांदा ट्रक्टरचे पुजन नाफेड संकुलात खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष शांताराम नागरे यांचे हस्ते नारळ वाढवुन करण्यात आला. lasalgaon apmc market nafed buying onions prices increased

यावेळी संचालक जनार्दन जगताप, अनिल घोटेकर, सुरेश रायते, शंकर राव कुटे, प्रकाश कापडी, शिवाजी जाधव, धोंडीराम धाकराव, मधुकर दरेकर, राजाराम दरेकर, संघाचे व्यवस्थापक प्रकाश भालेराव व नाफ़ेडचे वरिष्ठ सहाय्यक पी. के. चाैबे  यांचेसह शेतकरी हजर होते.

lasalgaon apmc market nafed buying onions prices increased 24th april 2018, लासलगाव नाफेड कांदा खरेदी बाजारात चैतन्य; बाजारभावात २०० ते २५० रुपयांची वाढ aajcha kanda bhav maharashtra nashik lasalgaon आजचा कांदा बाजार भाव onion prices rates agriculture produce market committee bajarbhav ahamadnagar 2018

कांदा भाव २०० ते २५० रुपयांनी वाढला

या कांदा खरेदीसाठी लासलगाव खरेदी विक्री संघाच्या माध्यमातुन खरेदी विक्रीची व्यवस्था पाहीली जाणार अाहे. नाफेडच्या  या कांदा खरेदीमुळे बाजारभावात सुमारे २०० ते २५० रु. भाववाढ दिसुन आली. ता.२० रोजी ६०० ते ६५० रु.क्विटलने विकणारा कांदा नाफेडच्या आगमनाने ८०० रु. क्विंटलवर पोहचला. lasalgaon apmc market nafed buying onions prices increased

शेतीमालाचे भाव पडल्यावर केंद्र सरकारच्यावतीने किंमत स्थिरीकरण कोषातुन शेतमाल खरेदी करण्याची योजना सरकार राबवत असते. सदरची कांदा खरेदी या योजनेतंर्गत होत असल्याची माहीती पाटील यांनी यावेळी दिली.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

कांद्याच्या भावामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्याला नाफेडच्या कांदा खरेदीने दिलासा मिळणार आहे. लासलगाव येथील नाफेड संकुलात सुमारे पंधरा हजार मेट्रिक टन कांदा साठवणुकीची व्यवस्था आहे. याशिवाय राष्ट्रीय बागवानी संघ यांच्याकडे सुमारे एक हजार मेट्रिक टन कांदा साठवला जाऊ शकतो. lasalgaon apmc market nafed buying onions prices increased

ज्यावर्षी कांद्याचे उत्पादन भरपूर असल्यामुळे पिंपळगाव व कळवण आदी ठिकाणीही नाफेडच्या वतीने कांदा खरेदी करण्यात येणार आहे सरकारने कांद्याचे भाव सुधारावेत म्हणून हे पाउल उचलले आहे.

या हंगामाची चिंता संपली

सध्या उन्हाळ कांद्याची काढणी हंगाम सुरू आहे. पुढील सहा महिन्यांच्या काळात कांद्याचा हंगाम नसल्याने हा कांदा साठवणूक करून आगामी काळात मोठ्या शहरात विक्री करण्यात येणार आहे. उच्च प्रतिचा कांदा प्रचलित बाजारभावात सर्वोच्य दराने  खरेदी करण्याचे आदेश केंद्र सरकारकडून दिले गेले असल्याची माहिती नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी यावेळी दिली. lasalgaon apmc market nafed buying onions prices increased

शेतकऱ्यांना मिळणार तत्काळ पैसे

सदर कांदा विक्रीचे पैसे शेतकऱ्यांना तात्काळ धनादेशाने किंवा RTGS, NEFT या व्यवस्थेने देण्यात येणार आहे. आजच्या प्रारंभीचा ट्रॅक्टर महेश दामू घोरपडे राहणार पाटोदा यांच्या मालकीचा कांदा ७७० रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी करण्यात आला. सकाळच्या सत्रामध्ये आठशे दहा रुपये प्रतिक्विंटलचा कांदा खरेदी केला गेला.

lasalgaon apmc market nafed buying onions prices increased

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा !

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.