कांदा भाव घसरला; बळीराजा चिंताग्रस्त

लासलगाव (वार्ताहर) समीर पठाण : इतर राज्यात उपलब्ध असलेला उन्हाळ कांदा आणि आवक जास्त असल्यामुळे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सह जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचा भाव सातत्याने कोसळत असल्याचे चित्र आहे. Lasalgaon apmc kanda market nashik prices down

लासलगाव बाजार समिती आज शुक्रवारी ७९५ वाहनातून १३ हजार क्विंटल कांदा आवक होऊन लिलाव झाला. त्यात लाल कांद्याला किमान ४०० रु. प्रति क्विंटल व सरासरी ७२१ रु. प्रति क्विंटल भाव मिळत आहे. तर उन्हाळ कांद्याला जास्तीजास्त ८९१ रुपये सरासरी ७४० रुपये तर कमीतकमी ५०० रुपये प्रति क्विंटल कांद्याला भाव मिळाला. अशा कवडीमोल भावात विकावे लागत असल्याने कांदा उत्पादक शेतक-यांच्या चिंतेत भर पडली आहे.

नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांत कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. मार्च ते एप्रिलपर्यंत जिल्ह्यात कांद्याची आवक होत राहणार आहे. या उन्हाळ कांद्याची टिकवण क्षमता कमी असते. त्यात गुजरातसह अन्य राज्यांतील उन्हाळी कांदा बाजारात दाखल झाला आहे. तसेच त्या-त्या राज्यातील स्थानिक बाजारपेठेत तेथील कांदा आला असल्याने नाशिकच्या कांद्याला मागणी कमी आहे. त्यामुळे बाजारभावातील ही घसरण अशीच सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

कांद्याचे सरासरी दर घसरण्यामागे कांद्याची इतरत्र व स्थानिक बाजारात वाढलेली आवक देखील कारणीभूत असल्याचेही मत कांदा तज्ज्ञ व्यक्त करतात.

उत्तर भारतातील होळीसाठी कामगार सुटीवर गेलेले असल्याने कांदा लोडिंगसाठी मजूर नसल्यानेही कांदा खरेदीवर परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे. Lasalgaon apmc kanda market nashik prices down

कांदा लागवडीपासून तर बाजारात विक्रीपर्यंत शेतकऱ्यांना १० ते १२ रुपये प्रति किलोमागे खर्च येतो. त्यामुळे आज उत्पादक किलोमागे १ ते ३ रुपयांनी तोटा सहन करीत आहेत.

शेतकऱ्याला वाहनातून कांदा मार्केटला घेऊन जाणे हा खर्च सध्याच्या भावाने परवडणारा नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. यामुळे किरकोळ बाजारात मात्र सर्वसामान्य ग्राहकांना स्वस्तात कांदा किरकोळ बाजारात मिळत आहे.

Lasalgaon apmc kanda market nashik prices down
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.