जवान आत्महत्या प्रकरण : पत्रकार पूनम, निवृत्त लष्कर अधिकारी यांचा जामीन फेटाळला

जवान आत्महत्या प्रकरण : पत्रकार,निवृत्त अधिकारी यांचा जामीन फेटाळला

नाशिक : लष्करी छावणी असलेल्या आणि प्रशिक्षण केंद्र असलेल्या देवळाली कॅम्प येथे लष्करी जवान तर सिपोय म्हणजेच सहायक पदावर काम करत असलेल्या  मॅथ्यूने आत्महत्या केली होती. या प्रकरणी स्टिंग ऑपरेशन केले होते. हे प्रकरण इतके वाढले होते की सर्व चुकीच्या गोष्टी लष्काकारणे केल्या असे चित्र निर्माण झाले.त्यावर भारतीय लष्कराने फिर्याद दिली होती. त्यावर  दिल्लीतील महिला पत्रकारावर गुन्हा दाखल झाला होता.यात जामीन अर्ज केला असता न्यायालयाने अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आता पत्रकारांच्या  अडचणी वाढल्या  आहेत. तर या प्रकरणाचे पूर्ण देशात पडसाद उमटले होते.

आज जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. पठाण यांनी पत्रकार अग्रवाल आणि दीपचंद या दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला.जवान मॅथ्यू आत्महत्याप्रकरणातील गुन्हा दाखल असलेल्या पत्रकार महिलेचा अटकपूर्व जामीन फेटाळला लावला त्यामुले या प्रकरणाची समूळ चौकशी होणार हे स्पष्ट होत असून पूनम अग्रवाल आणि दीपचंद यांना लवकर अटक होण्याची शक्यता आहे.

काही महिन्यापूर्वी देवळाली कॅम्प येथे लष्करी जवान रॉय मॅथ्यू या जवानाने आत्महत्या केली होती. स्टिंग ऑपरेशन करणारी द क्विंट न्यूज चॅनल ची दिल्ली  येथील पत्रकार पूनम अग्रवाल आणि सेवानिवृत्त अधिकारी दीपचंद या दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि ऑफिसर सिक्रेट अॅक्टचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पूनमने लष्करातील काही अधिकाऱ्यांची पोलिसांत ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे.
सहायक आय पदावर काम करत असलेल्या लष्करी जवान रॉय मॅथ्यू याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याआधी अधिकाऱ्यांकडून कशाप्रकारे जवानांना घरातील कामांमध्ये अडकवले जातेतसेच त्यांच्याकडून घरकामे,अधिकाऱ्याची मुले सांभाळणेकुत्रे फिरवण्यास घेऊन आदी कामे कशी करून घेतली जातात. याचे स्टिंग ऑपरेशन क्विंट या वेबसाईटच्या पत्रकार असलेल्या अग्रवाल यांनी  केले होते.
देवळाली कॅम्पमधील बेपत्ता जवान डि. एस. राव मॅथ्यूजचा (३३) संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती . देवळाली कॅम्प परिसरातील एका खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळला होता.
मॅथ्यूज मुळचा केरळमधील कोलम येथील रहिवासी होता.  मॅथ्यूज गेल्या १३ वर्षांपासून लष्करात कार्यरत होता.नाशिक येथील तोफखाना केंद्रात कार्यरत होता. वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या मुलांना शाळेत सोडणे, त्यांचे पाळीव श्वान सोडणे आणि वरीष्ठांकडून जवानांना गुलामासारखी वागणूक दिली जात असल्याचा एक व्हिडीओ देवळालीत व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे मोठा वादही निर्माण झाला. लष्करी अधिकाऱ्यांवर मोठी टीका होऊन वरीष्ठ पातळीवरून त्याची चौकशी सुरू होती.

हा व्हिडिओ मॅथ्यूजने व्हायरल केल्याचा संशय वरीष्ठ अधिकाऱ्यांचा होता. या प्रकरणानंतर इतर जवानांसह मॅथ्यूजचीही चौकशी करण्यात येत होती. मात्र २५ फेब्रुवारीपासून तो अचानक गायब झाला आणि अनेक दिवस त्याचा काहीच पत्ता लागला नाही. मात्र गुरूवारी संध्याकाळी कॅम्पमधील एका निर्जन भागातील खोलीत त्याचा गळफास घेतलेला मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.