Video : नांगरे पाटील यांचा तिच्या शौर्याला सलाम, ती लढली चाकूधारी दरोडेखोरासोबत

स्टेट बँक ग्राहक केंद्रात शिरलेल्या चाकूधारी दरोडेखोराशी मोठ्या धैर्याने झुंज देणाऱ्या रणरागिणी सौ. सविता सागर मुर्तडक-आखाडे चा पोलीस आयुक्तांच्या हस्ते जाहीर सत्कार!

…अशी घडली होती घटना

स्थळ : स्टेट बँक ग्राहक केंद्र,अशोकनगर, सातपूर, नाशिक.

दिनांक : १७ मे २०१९

वेळ : दुपारी २ वाजेची… केंद्रात एकटीच बसलेली महिला…

अचानकपणे तब्बल सहा ते साडे सहा फूटी इसम केंद्रामध्ये प्रवेश करतो… काही कळायच्या आतच महिलेला चाकुचा धाक दाखवून निमूटपणे कॅश माझ्याकडे दे, अन्यथा तुला मारून टाकेन, अशी धमकी तो देतो…ड्रॉव्हरमध्ये जबरदस्तीने हात टाकून कॅश लुटण्याचा प्रयत्न करतो… मात्र अशाही परिस्थितीत ही महिला जिवाची पर्वा न करता मोठ्या धैर्याने त्या चोराचा प्रतिकार करते… तब्बल दहा मिनिटे दरोडेखोराशी झटापट सुरूच असते…

झटापटीत ही महिला त्याला दोन-तीनदा खालीही पाडते…एका धडधाकट पुरुषाशी एकटी महिला झुंज देईल तरी किती…अखेरीस हा दरोडेखोर ४० ते ५० हजार रुपये लुटून नेण्यास यशस्वी होतो…जाताना महिलेच्या हातावर चाकू हल्ला करून तिला जोरात लाथ मारतो…ती लांब जाऊन कोसळते… ती उठण्याच्या आतच तिला आतमध्ये कोंडून ऑफिसला बाहेरून कडी लावून हा चोरटा पळ काढतो…हा सर्व थरार ऑफिसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होतो…काही वेळातच घटनास्थळी पोलिसांचा ताफा दाखल होतो…सगळी माहिती घेतल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासले जातात… महिलेने दरोडेखोराशी दिलेली झुंज पाहून पोलीसही तोंडात बोट घालतात… स्वतः पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे देखील फुटेजमधील महिलेचे धैर्य पाहून थक्क होतात… आता काहीही झाले तरी या चोरीचा छडा लावायचाच, असा चंग बांधत लवकरात लवकर या हरामखोराच्या मुसक्या आवळण्याचे फर्मान गुन्हे शाखेला सोडतात…मग काय रात्रंदिवस एक करून अवघ्या १२ दिवसात घटनेची उकल होते…गुन्हे शाखा युनिट १चे पथक दरोडेखोराला पकडण्यात यशस्वी होतात…

…या घटनेत शरीराने नाजूक असलेल्या एकट्या महिलेने जिवाची पर्वा न करता मोठ्या धैर्याने चाकूधारी धडधाकट पुरुषाशी दिलेली झुंज खरोखर वाखाणण्याजोगी तर आहेच, शिवाय प्रत्येक महिलेला प्रेरणा देणारी आहे…

इथे बघा त्या घटनेचे सिसिटीव्ही फुटेज :

नक्कीच बघा

पुरुषालाही लाजवेल असा पराक्रम या रणरागिणीने करून समाजापुढे एक मोठा आदर्श आणि प्रेरणा उभी केली आहे.

…म्हणूनच पोलीस आयुक्त कार्यालयात गुरुवारी (दि.३०) सकाळी ११ वाजता झालेल्या कार्यक्रमात पोलीस आयुक्त मा. विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते या महिलेसह तिच्या पतीचाही जाहीर सत्कार करण्यात आला…

या धाडसी, पराक्रमी, बलशाली, प्रेरणादायी, रणरागिणीचं नाव आहे…

कार्यक्रम संपल्यानंतर केवळ या महिलेच्याच भोवती माध्यम प्रतिनिधींचा गराडा होता.

सौ. सविता सागर मुर्तडक-आखाडे

जो-तो झालेला घटनाक्रम आणि दरोडेखोराशी दिलेली कडवी झुंज याबाबतच महिलेला विचारताना दिसत होता. सौ. सविता सागर मुर्तडक-आखाडे यांच्या धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच!

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.