कुशावर्त तिर्थाचे शुद्धीकरण व सुशोभीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण करावे – अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई :बारा ज्‍योर्तिलिंगापैकी एक असलेल्‍या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्‍वर येथील कुशावर्त तिर्थाचे शुद्धीकरण व सुशोभिकरणाचे काम कालबध्‍द कार्यक्रम आखुन पूर्ण करावे असे निर्देश अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. या कामासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्‍वाही सुध्‍दा त्‍यांनी दिली.kushavarta kund trimbakeshwar fast work orders sudhir mungantiwar 

सहयाद्री अतिथीगृह मुंबई येथे कुशावर्त तिर्थाचे सुशोभिकरण व शुद्धीकरण करण्‍याबाबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बैठक बोलिविली होती. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर येथील ब्रम्‍हगिरी पर्वतावर उगम पावलेली दक्षिणवाहिनी गोदावरी नदी ही श्री तिर्थराज कुशावर्त तिर्थ येथुन प्रवाहीत होते. कुशावर्त तिर्थाचे प्राचीन काळापासुन धार्मिक महत्‍व आहे. कुशावर्त तिर्थावर सिंहस्‍थ कुंभमेळा भरत असल्‍याने व याठिकाणी हजारो भाविक स्‍नान करीत असल्‍यामुळे या तिर्थाचे शुद्धीकरण व सुशोभीकरण होणे अतिशय गरजेचे आहे, असे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.kushavarta kund trimbakeshwar fast work orders sudhir mungantiwar 

या बैठकीला नगर परिषद प्रशासन संचालनालयाचेप्रादेशिक उपसंचालक विजय कुलकर्णी, त्र्यंबकेश्‍वरच्‍या मुख्‍याधिकारी डॉ. चेतना केसरे, जिल्‍हाप्रशासन अधिकारी देविदास टेकाडे, नगराध्‍यक्ष पुरूषोत्‍तम लोहगांवकर, उपनगराध्‍यक्ष  स्‍वप्‍नील शेलार,निरीच्‍या संशोधक राधिका देवरे यांच्‍यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कुशावर्त तिर्थकुंडाची क्षमता 9 लक्ष लिटर असून नगर परिषदेमार्फत सिंहस्‍थ कुंभमेळा सन 2015 अंतर्गत महाराष्‍ट्र जीवन प्राधिकरण यांच्‍या मार्फत जलशुद्धीकरण केंद्र उभारण्‍यात आले आहे. सदर जलशुद्धीकरण यंत्रणेची क्षमता 2.40 दशलक्ष लिटरची आहे. यासाठी अंदाजे 2 कोटी 49 लक्ष जलशुध्‍दीकरण यंत्रणेचा खर्च झाला आहे. सदर तिर्थाचे शुद्धीकरण व सुशोभिकरणाच्‍या कामासाठी सुधारित अंदाजपत्रक व आराखडे तयार करण्‍याची कार्यवाही महाराष्‍ट्र जीवन प्राधिकरणाच्‍या माध्‍यमातुन सुरू असून त्‍यानुसार निधीची मागणी करण्‍यात येईल, अशी माहिती मुख्‍याधिकारी नगर परिषद त्र्यंबकेश्‍वर यांनी यावेळी दिली.kushavarta kund trimbakeshwar fast work orders sudhir mungantiwar 

कुशावर्त तिर्थाचे शुद्धीकरण  व सुशोभीकरण करणेसाठी निरीचे सहकार्य घ्यावे  व उत्कृष्ट असा आराखडा तयार  करावा, त्यासाठी अत्याधुनिक व  सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान वापरावे. सौर उर्जा, पवन उर्जा यांचा उपयोग करावा,    शासन निधीची कमतरता भासू देणार नाही, जिल्हा  नियोजन समितीद्वारेही निधी उपलब्ध करुन दिला  जाईल असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगीतले.जिल्हाधिकारी,  नाशिक  यांनी बैठक  घेऊन संबधित यंत्रणांना उचित  निर्देश द्यावेत,  मोठ्या संखेने भाविक त्र्यंबकेश्वर येथे येतात व कुशावर्त तिर्थात स्नान करतात याचा विचार करता सदर विषय संवेदनशिलतेने हाताळावा असेही ते यावेळी म्‍हणाले.

kushavarta kund trimbakeshwar fast work orders sudhir mungantiwar 
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.