माझ्या यशात मविप्र संस्थेचा मोठा वाटा – कुलगुरु डॉ वासुदेव गाडे

मराठा विद्या प्रसारक समाजाच्या महाविद्यालयाच्या सर्व प्राचार्यांच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ वासुदेव गाडे यांचा शिक्षणशास्र् महाविद्यालय येथे सत्कार समारंभ आयोजित केला होता , याप्रसंगी डॉ गाडे यांनी आपल्या कारकिर्दीविषयी बोलतांना , माझ्या यशस्वी कारकिर्दीमध्ये विद्यापीठ क्षेत्रातील विविध संस्था त्यातही प्रामुख्याने मविप्रच्या सरचिटणीस श्रीमती निलिमाताई पवार यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्या योगदानामुळेच मी विद्यापीठात वेगवेगळ्या योजना राबवू शकलो त्यात माझे विश्वासु सहकारी डॉ व्ही बी गायकवाड यांचीही साथ लाखमोलाची ठरली असे त्यांनी नमूद केले. १६ मे २०१२ ते १५ मे २०१७ अशी मॅरेथॉन कारकीर्द त्यांना लाभली. येत्या १५ मे रोजी ते कुलगुरू पदावरून निवृत्ती घेतांना समाधान आणि कृतार्थ भावनेने निःश्वास टाकण्याचा आनंद काही औरच असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व प्रतिमापुजनाने झाली. याप्रसंगी के टी एच एम महाविद्यालयाचे प्राचार्य तथा बीसीयुडी चे माजी संचालक व्ही बी गायकवाड , शिक्षणाधिकारी डॉ डी डी काजळे , डॉ दिलीप धोंडगे , डॉ चंद्रकांत बोरसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
 शिक्षणशास्र् महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ चंद्रकांत बोरसे यांनी अतिथींचे स्वागत केले. डॉ व्ही बी गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. डॉ दिलीप धोंडगे व डॉ डी बी शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचलन व आभार डॉ कैलास खोडे यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.