सर्व प्रकारचे भेदभाव विसरून ज्ञानाधारीत समाजरचनेची गरज : मुख्यमंत्री

विकासासाठी ज्ञानाधारीत समाजरचनेची गरज : मुख्यमंत्री

धामणकर भगिनी यांच्याकडून शाळेला एक कोटीची देणगी

नाशिक : शाश्वत विकासासाठी सर्वांना समानता देणाऱ्या आणि सर्व प्रकारच्या भेदभाव विसरून ज्ञानाधारीत समाजरचनेची गरज आहे असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शतक महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय काकतकर, संस्थेचे कार्याध्यक्ष महेश दाभक, विनायक गोविलकर, देणगीदार गंगूताई धामणकर आणि सिंधूताई धामणकर आदी उपस्थित होते.

पूर्वी शिक्षणाबाबत राज्याचा देशात पंधरावा क्रमांक होता. आता सरकारने प्रगत शिक्षण अभियानाची अंमलबजावणी केली. ४० हजार शाळांचा विकास केला आहे. जिल्हा परिषद शाळांमधील ४४ हजार शिक्षकांनी टेक्नोसॅव्ही होत आहेत. त्यामुळेच आता देशात राज्य तिसऱ्या क्रमांकावर आले आहे. शैक्षणिक सुधारणांच्या या प्रयत्नांमुळे राज्य लवकरच देशात पहिल्या क्रमांकावर जाईल असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी देणगीदार धामणकर भगिनी यांनी एक कोटी रुपये दिले. त्याचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.