महाराष्ट्राचे दोन्ही संघ उपउपांत्य फेरीत, महाराष्ट्राच्या मुलांनी कर्नाटकला नमविले

२८व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धा
नाशिक : दिनांक २६ मे :  नाशिक जिल्हा खो- खो  संघटनेच्या वतीने आणि नाशिक महानगरपालिकेच्या  प्रमुख सहकार्याने नाशिकच्या  छत्रपती  शिवाजी स्टेडियम येथे दिनांक २४ मे पासून  असलेल्या २८व्या   उप कनिष्ठ गटाच्या खो -खो स्पर्धेत आजच्या चौथ्या दिवशी महाराष्ट्राच्या मुलांनी आपल्या बॅड फेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातही सहजसुंदर खेळाचे प्रदर्शन करत दिल्ली विरुद्धचा सामना १६ विरुद्ध ०३ अश्या मोठ्या फरकाने जिंकून उपउपांत्य  फेरीत प्रवेश केला.
महाराष्ट्राकडून खेळताना साहसी सर्जेने अष्टपैलू खेळ करत ३.२० मिनिटे पळून काढली आणि तीन गाडीही बाद केले. तर रितीका मगदुनने २.२० मिनिटे पळतीचा खेळ करून दोन गडीही बाद केले. गौरी शेंडेने धारधार आक्रमण करतांना तीन गडी टिपले. तर साक्षी वाळेकरने १. १० मिनिट पळतीचा खेळ करतांना दोन गडीही बाद केले. तसेच ऋतुका राठोड (दोन गडी बाद ), मयुरी पवार (२. ३० मिनिट पळती ) वैष्णवी पालवे  (१. २० मिनिट पळती आणि १ गडी  ) अश्या सांघीक प्रयात्नामुळे महाराष्ट्राच्या मुलीनी दिल्लीवर आरामात मत करून उपउपांत्य फेरीत प्रवेश केला.

मुलीप्रमाणे महाराष्ट्राच्या मुलांनीही बलाढ्य कर्नाटकचे आव्हान संपुष्ठात आणले. महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या नाशिकच्या चंदू चावरेने या सामन्यातही संरक्षणात नेहमीप्रमाणे ३.३० मिनिटे पळतीचा खेळ करून तब्बल १० गडी बाद करत अष्टपैलू कामगिरी केली. तसेच महाराष्ट्राच्या सचिन आहेरने १.१० मिनिटे पळतांना तीन गडीही  टिपले. तारशुभम थोरातने २. मिनिटाचा पळतीचा खेळ करतांना दोन गाडयांना बाद केले. तारमोहन चौधरीने दोन गडी बॅड करून चांगली साथ दिले. या सर्वांच्या कामगिरीमुळे महाराष्ट्राला कर्नाटकवार १४- ११  असा विजय मिळविता आला. कर्नाटक संघ तास खो- खो मध्ये बलाढ्य मानला जातो पहिल्या तीनमध्ये असणाऱ्या कर्नाटकाला मात्र साखळीतच पराभव पत्करावा लागल्यामुळे गटात दुसऱ्या स्थानावर आल्यामुळे त्यांना उपउपांत्यपूर्व फेरीतच महाराष्ट्राशी भिडावे लागल्यामुळे त्यांना उपउपांत्यपूर्व फेरीतच स्पर्धेच्या बाहेर पडण्याची वेळ आली. इतरमुलांच्या सामन्यात आंध्र प्रदेशने विदर्भाचा १०-०४ , कोल्हापूरने पॉण्डेचारीचा १४-१० , तेलगानाने पश्चिम बंगालचा १२-०७ असा पराभव केला. मुलीमध्ये कर्नाटकाने उत्तर प्रदेशला १२-०३ , ओरिसाने विदर्भला १३-०६, झारखंडने गुजराथला १७-१६, तर केरळने हरायणाला १०-०८ असे पराभूत करून  उपउपांत्य फेरी गाठली.

दरम्यान अखिल भारतीय खो खो महासंघाचे संयुक्त सचिव श्री रामदास धरणे (वय ७०) यांचे आकस्मित निधन झाल्याची बातमी समजल्याने सामने काही काही वेळासाठी थांबविण्यात आले. भारतीय  खो-खो, महाराष्ट्र खो खो आणि नाशिक जिल्हा खो-खो संघटनेचे झेंडे अर्ध्यावर करण्यात आले होते.

आजच्या उपउपांत्य पूर्व  सामन्यांचे निकाल

मुले

१) महाराष्ट्र विजयी  विरुद्ध कर्नाटक  ( १४ विरुद्ध ११)
२) कोल्हापूर  विजयी  विरुद्ध  राजस्थान( १४  विरुद्ध १० गुण )
३) तेलगाना  विजयी  विरुद्ध  बंगाल  ( १२ विरुद्ध ०७ गुण )
४) केरळ   विजयी  विरुद्ध  गुजराथ    ( १३ विरुद्ध ०९ गुण )
५)उत्तर  प्रदेश   विजयी  विरुद्ध  छत्तीसगड   (१४ विरुद्ध १२ गुण )

मुली

१) महाराष्ट्र विजयी  विरुद्ध दिल्ली   (१० विरुद्ध ०३)
२) ओरिसा  विजयी  विरुद्ध विदर्भ  (३० विरुद्ध ०६)
३) केरळ   विजयी  विरुद्ध  हरयाणा    ( १० विरुद्ध ०८ गुण)
४) झारखंड    विजयी  विरुद्ध  गुजराथ    ( १७ विरुद्ध १६ गुण)
५) आंध्र    विजयी  विरुद्ध  मध्य प्रदेश  ( १० विरुद्ध ०३ गुण)
६) पश्चिम बंगाल  विजयी  विरुद्ध  पॉंडेचरी  ( ०८ विरुद्ध ०६ गुण)
७) तमिळनाडू  विजयी  विरुद्ध कोल्हापूर    ( १० विरुद्ध  आणि ०९ गुण)

फोटो : चौथ्या दिवशी महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक या मुलांच्या सामन्यातील अटीतटीचे क्षण

 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.