घशात अडकले खेकड्याचे कवच, दुर्बिण शस्त्रक्रिया करून काढले बाहेर  

नाशिक : शहराजवळील गिरणारे परिसरात राहण्याऱ्या युवतीच्या घशात अडकलेले खेकड्याचे कवच यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया करून काढण्यात आले आहे. त्यामुळे सदरच्या युवतीचा जीव वाचला आहे. सुशिला भगवान भोये (२२) असे रुग्ण युवतीचे नाव आहे.khekda kalvan crab gravy bone stuck neck doctor operate saves girl 

दुपारी राहत्या घरी जेवण करत असताना तिने खेडक्‍याची भाजी खाल्ली. त्यावेळी खेकड्याचा टणक असे कवच तिच्या घशामध्ये अडकले. त्यामुळे तिला त्रास होऊ लागला असता. दुपारी चार वाजेच्या सुमारास तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर  जिल्हा रुग्णालयात तिच्या घशाचा एक्‍स-रे काढण्यात आला.khekda kalvan crab gravy bone stuck neck doctor operate saves girl 

उदाहरण म्हणून खेकडा कालवण

यात ठणक असा पदार्थाचा तुकडा घशाच्या वरच्या बाजुला अडकला असल्याचे समजले. जिल्हा रुग्णालयातील कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. संजय गांगुर्डे यांनी संपूर्ण तपासणी केली. त्यानंतर मंगळवारी जिल्हा रुग्णालयात विभागात उपचार करण्यात आले. यावेळी तिला भूलतज्ज्ञामार्फत भूल न देताच दुर्बिनीद्वारे त्यांच्या घशात अडकलेले हाड काढण्याचा निर्णय घेतला.khekda kalvan crab gravy bone stuck neck doctor operate saves girl 

यानंतर डॉक्टरांनी अवघ्या काही वेळात दुर्बिनीच्या मदतीने शस्त्रक्रिया करून भोये यांच्या घशात अडकलेले कवच बाहेर काढले.  या घटनेमुळे महिलेस जीवदान मिळाले असून तिच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत. यावेळी डॉ. गांगुर्डे यांच्यासह डॉ. शेळके आणि शस्त्रक्रिया विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

इतर महत्वाच्या बातम्या

आर्मी परिसरात तोफगोळ्याचा स्फोट: एक ठार, चार गंभीर जखमी

भारतरत्न वाजपेयी यांच्या अस्थिकलशाचे दर्शन, दि.24 ऑगस्टला रामकुंडात विसर्जन

ई-शॉपिंग मॉल बुडाला, कोट्यावधी रुपयांची फसवणूक. जास्त व्याजाला भुलले नाशिककर

घोटी टोल नाका :अपघातात तरुणाचा मृत्यू, सर्वपक्षीय आंदोलन करत टोलनाका केला बंद

अनैतिक सबंध : जेलरोड परिसरात एकाचा खून, आरोपीस अटक

लासलगाव सह महाराष्ट्रातील, आजचा कांदा भाव : डाळींब, टोमॅटो 22 ऑगस्ट 2018

khekda kalvan crab gravy bone stuck neck doctor operate saves girl
Share this with your friends and family

You May Also Like

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.