देशातील झालेल्या महिला अत्याचारा विरोधात मुस्लीम समाजातर्फे स्वाक्षरी मोहीम

Share this with your friends and family

नाशिक :देशात झालेल्या मुलींवर अत्याचार प्रकरण आणि दिल्ली, उत्तर प्रदेश , गुजरात येथील घटनांचा निषेद करत शरियत बचाव कमिटीच्या वतीने स्वाक्षरी अभियान राबविण्यात येणार असल्याचे शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांनी जाहीर केले आहे. या अनुषंगाने नाशिकमध्ये ५० मशिदींबाहेर स्वाक्षरी अभियान राबवले जाणार आहे.katua case signature campaign shariyat bachav committee nashik today

नाशिकमधील ५० मशिदींच्या प्रवेशद्वारावर आज रात्री ‘शब-ए-मेराज’च्या औचित्यावर ही मोहीम सुरु होते आहे. मुस्लीम समाजात ‘शब-ए-मेराज’ मोठे महत्व असून याच दिवशी मोठ्या गर्दीने बांधव मस्जिद मध्ये नमाज पठणाला येतात. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना या विषयी माहिती देण्यासाठी हा दिवस निवडला आहे.

जम्मूच्या कठुआ आणि उत्तरप्रदेशच्या उन्नावमध्ये घडलेल्या पाशवी बलात्काराच्या घटनांचा निेषेधार्थ अधिकधिक लोकांनी स्वाक्ष-या करुन संबंधित संशयित आरोपींना फाशीच्या शिक्षेच्या मागणीला समर्थन दर्शवून सरकारपर्यंत भावना पोहचवल्या जाणार आहेत. शहरातील सुमारे ५० मशिदींच्या धर्मगुरूंना (मौलाना) याबाबत कल्पना दिली असून स्वाक्षरी अभियानाची व्यवस्था करण्याचे सुचविले आहे.

katua case signature campaign shariyat bachav committee nashik today

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi, Your Name  or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा !

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.