Kasara Ghat Accident :थरार – कंटेनरचे ब्रेक फेल, २० हून अधिक गाड्यांना धडक

आज सकाळी मुंबईकडे लोखडी सळ्या घेऊन निघालेल्या कंटेनरचे अचानक  ब्रेक  फेल झाल्याने कसारा घाटात रविविरी भयानक स्थिती निर्माण झाली. या कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने त्यावरील चालकाचा ताबा सुटला आणि कंटेनर २० हून अधिक वाहनांना धडक देत पुढे निघाला तर तो पुढे जात अखेरीस गँस टँकरला धडक देत हा कंटेनर थांबला होता. मात्र सुदैवाने गँस गळती झाली नाही. मात्र हा जीवघेणा ब्रेक फेलचा प्रकार जवळपास २० मिनिटे सुरु होता, यामध्ये  अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. Kasara Ghat Accident

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी नऊ वाजता हा सर्व भयानक प्रकार झाला होता.तर दुसरीकडे रविवारची सुट्टी असल्याने कसारा घाटात प्रवासी वाहनांची संख्या फार मोठ्या प्रमाणात होती. त्याच गर्दीच्या वेळी मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनर एमएच ४६-एच २९८८  चे ब्रेक फेल झाले.

मुंबई हुन नाशिक आणि नाशिक हुन मुंबई जाणाऱ्या प्रवाशांनी प्रवास रद्द करावा.कसारा घाट 40 ते 50 km जाम, टँकर उलटला काही लोक जखमी मात्र जीवितहानी नाही

Nashik On Web ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಭಾನುವಾರ, ನವೆಂಬರ್ 3, 2019
कसारा घाट अपघात

येथे बघा व्हिडीओ – Facebook – Nashik On Web – Video

यामुळे चालकाचे नियंत्रण सुटलेला कंटेनर समोर आलेल्या वाहनांना धडका देत पुढे निघाला होता. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मोठा गोधळ निर्माण झाला होता. यातच कंटेनर न थांबल्याने व नियंत्रण सुटल्याने  २० ते २५ वाहनांना धडक दिली आहे . तर पुढे जात गँस टँकरला धडक देत हा कंटेनर थांबला. गँस टँकरला धडक बसल्याने जखमी झाले आहेत. कसारा घाटातील वाहतूक जुन्या घाटातून सुरु असून, नवीन घाटात अपघात झाला आहे.

या अपघाताचे वृत्त समजताच कसारा पोलिस, महामार्ग विभाग, रूग्णवाहिका, वैद्यकीय पथकांनी अपघातस्थळी धाव घेतली. अपघाताने वाहतूक ठप्प झाल्याने अनेक वाहने माघारी फियेवल्याचे सुनील पैठणकर,विनोद पाटील यांनी तात्काळ घटनेची माहिती संबंधित विभागाचे अधिकारी यांना दिली तर आमदार छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक महेश पैठणकर यांना सुनील पैठणकर यांनी सांगितले असता,तात्काळ जखमींना अधिक उपचारासाठी नाशिक येथे दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका,वैद्यकीय अधिकारी यांचे पथक घटनास्थळी पाठविले.

अपघात जखमी प्रवासी…
1) अलका मोरे
2) अविनाश मोरे
3) पूजा गांगुर्डे
4) ऋतुजा शेळके (वय 3 वर्ष)
5) स्वरा शेळके (वय 1 वर्ष)
6) राजेंद्र घुगे
7) भाग्यश्री शेळके
8) चैताली दराडे

दरम्यान,संबंधित विभाग किंवा टोल वसुली करणारे,कंत्राटदार यांचे कोणीही उपस्थित नव्हतेच पण घाटातील सर्व गाड्या बाजूला करण्यासाठी ज्या क्रेन उपलब्ध करण्यात आल्या त्या अतिशय जुन्या आणि कालबाह्य आहेत. त्यामुळे बचाव कार्याला फार उशीर लागला होता. सुमारे दोन तासानंतर घाटातील वाहतूक काही प्रमाणात  व्यवस्था सुरळीत करण्यात आली आहे.  कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस.बी.महाले,राठोड व अधिकारी- कर्मचारी हे याठिकाणी काम करत आहेत. तर नाशिक येथून मुंबईकडे जाणारी वाहतूक कसारा जुन्या घाटातून वळवली असे कसारा पोलिसांनी सांगितले आहे. Kasara Ghat Accident

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “Kasara Ghat Accident :थरार – कंटेनरचे ब्रेक फेल, २० हून अधिक गाड्यांना धडक

  1. Aamhi suddha kaal sayankali ya traffic mdhe adaklelo.. sandyakali 7.30 te 2.15 ya velet aamhi tethe hoto. fakta 2 taas traffic nwata.. ani kuthlyahi prakarchi traffic yantrana karyarat nwati.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.