रोटरी क्लबचा उपक्रम :‘कर्मजागृती’ नाशिक जिल्ह्यात विविध शाळांतील लाखो विद्यार्थ्यांनी घेतली तंबाखू विरोधी शपथ

रोटरी क्लब  नाशिक नॉर्थ तर्फे नाशिक  तर रोटरी क्लब ऑफ इंटरनॅशनलचा १० जिल्ह्यात जनजागृती उपक्रम२० मिनिटांची माहितीपर चित्रफित ‘Karmajagruti’ millions students different schools Nashik District took anti-tobacco oath

नाशिक : नाशिक शहरात समाजसेवेसाठी कार्यरत असलेल्या रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थतर्फे शहरातील सरकारी आणि खासगी शाळेतील तीन लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी  आपला समाज तंबाखूमुक्त करण्यासाठी  जनजागृती करण्याची शपथ घेतली. रोटरी इंटरनॅशनलने महाराष्ट्रातील १० जिल्ह्यात एकाचवेळी राबविण्यात आलेल्या कर्मजागृती तंबाखूमुक्ती जनजागृती अभियाना अंतर्गतएकूण २० लाखपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे. विक्रमी संख्येत एकाचवेळी अशा प्रकारची शपथ घेण्यात आल्याचे दिसून आले असून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् ने स्वतःहून या उपक्रमाची दखल घेतली असून लवकरच या विक्रमाची नोंद घेतली जाणार आहे. ‘Karmajagruti’ millions students different schools Nashik District took anti-tobacco oath

रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थ अध्यक्ष मनीष ओबेरॉय यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्यात आला. ओबेरॉय प्रातिनिधिक स्वरूपात द्वारका सर्कल जवळील नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या एम. एस. कोठारी अकॅडमी या शाळेत उपस्थित होते. ‘कर्मजागृती’ या उपक्रमाअंतर्गत २७ जुलै रोजी हेड अॅण्ड नेक कॅन्सर डे (डोके आणि मानेचा कर्करोग दिवस) असल्याने दिवसाचे महत्व समजून सांगत प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना २० मिनिटांची चित्रफित दाखविण्यात आली. ज्याद्वारे तंबाखूयुक्त उत्पादनांच्या सेवनामुळे होणारे नुकसान, तोटे याबाबत अत्यंत सोप्या भाषेत संवाद साधण्यात यशस्वी झाल्याचे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील भाव सांगत होते. तर तंबाखू सेवन कधीही करणार नाही आणि मोठ्यांनाही कधीही सेवन करू देणार नाही याबाबतची शपथ देखील एम. एस. कोठारी शाळेच्या मुख्याध्यापिका सरिता देशपांडे यांच्या मुखाने विद्यार्थ्यांनी घेतली. ‘Karmajagruti’ millions students different schools Nashik District took anti-tobacco oath

संपूर्ण महाराष्ट्रात हा कार्यक्रम शालेय वेळेत सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेच्या दरम्यान यशस्वीपणे राबविण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रात हा कार्यक्रम शालेय वेळेत सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेच्या दरम्यान यशस्वीपणे राबविण्यात आला. डिस्ट्रिक्ट ३०३० मध्ये नाशिक जिल्ह्यातील सर्व १९ क्लबचे सदस्य, एन्कलेव्ह चेअरमन नरेश शाह, नाशिक जिल्ह्यासाठीचे प्रोजेक्ट डायरेक्टर राजेश पंचाक्षरी, सचिव निखिल खोत, नाना शेवाळे, राजेंद्र धारणकर, जगदीश आचरा यांच्यासह ५०० हुन अधिक रोटरीयन एकाचवेळी विविध शाळांमध्ये उपस्थित होते. नाशिक शहरात फ्रवशी अकॅडेमी, जेडीसी बिटको शाळा, अभिनव बालविकास मंदिर या खाजगी शाळांसह नाशिक महानगरपालिकेच्या सर्व शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा, एवढेच नव्हे तर पडसाद या मतिमंद मुलांच्या शाळेतही हा उपक्रम राबविण्यात येऊन विद्यार्थ्यांनी तंबाखूविरोधात जनगागृती करण्याची शपथ घेतली आहे. निफाड तालुक्यातील ३८८ हुन अधिक शाळांनी या अभियानात सहभाग नोंदवला. ‘Karmajagruti’ millions students different schools Nashik District took anti-tobacco oath

महाराष्ट्र राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण विभाग आणि क्रीडा व युवक सेवा संचनालय यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवत परिपत्रक काढले आहे. हा कार्यक्रम अर्थात मोहीम रोटरी क्लब ऑफ इंटरनॅशनल ३०३०, सबंध हेल्थ फाउंडेशन (एस.एच.एफ.) तर्फे आयोजित या उपक्रमात संपूर्ण राज्यात २० लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे प्रांतपाल राजीव शर्मा, या अभियानाचे प्रमुख डॉ. गोविंद मंत्री, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी लक्ष्मीकांत मणियार यांच्या प्रयत्नांनी हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.हा उपक्रम राज्यात नाशिक सोबतच जळगाव, बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, वर्धा, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या १० जिल्ह्यात देखील तंबाखू विरोधी जनजगृती मोहीम ‘कर्मजागृती’ राबविण्यात आला आहे.

शाळेतील विद्यार्थीवर्गाने तंबाखू विरोधी शपथ घेतली : 

“बाल अवस्थेतच मुलांना या भयानक तंबाखू विषयी जागृत करणे गरजेचे असून ही मुलेच मोठयांना समजावून सांगून तंबाखूपासून परावृत्त करू शकतात. त्यासाठीच कर्मजागृती म्हणजेच समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडण्यासाठीचीच ही शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली.  यावेळी २० मिनिटांची सोप्या भाषेत तंबाखूचे दुष्परिणाम समजावून सांगणारी चित्रफित उपस्थित बालकांना दाखवत कार्यक्रमाला उपस्थितांनीही शपथ घेतली आहे. हा माहितीपट www.drmantri.com अगदी मोफत डाऊनलोड कारणासाठी उपलब्ध असून  आठवड्यातून एकदा विद्यार्थ्यांना दाखविण्यात यावी असे आवाहन आम्ही करत आहोत.

– रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थचे, अध्यक्ष मनिष ओबेरॉय

 

तंबाखू सेवन कधीही करणार नाही आणि मोठ्यांनाही कधीही सेवन करू देणार नाही याबाबतची शपथ देखील एम. एस. कोठारी शाळेच्या मुख्याध्यापिका सरिता देशपांडे यांच्या मुखाने विद्यार्थ्यांनी घेतली.

 

रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थचे अध्यक्ष मनिष ओबेरॉय , नाशिक जिल्ह्यासाठीचे प्रोजेक्ट डायरेक्टर राजेश पंचाक्षरी, सचिव निखिल खोत, नाना शेवाळे, राजेंद्र धारणकर, जगदीश आचरा  आदी तंबाखू विरोधी शपथ घेतांना.
विद्यार्थी वर्गाने तंबाखू सेवन कसे वाईट आहे त्यामुळे शरिरावर कसा विपरीत परिणाम होतो हे २० मिनिटांची चित्रफित पाहून माहिती घेतली.
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.