श्री कपालेश्वर : पंचमुखी महादेव पालखी सोहळापंचमुखी महादेवाच्या पालखी सोहळ्याची तयारी पूर्णत्वाकडे

शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेला पंचमुखी महादेव पालखी सोहळापंचमुखी महादेवाच्या पालखी सोहळ्याची तयारी पूर्णत्वाकडे  चारही सोमवारचे नियोजन पूर्ण, भाविकांना दर्शनाची संधी

दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रावणी सोमवारीच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणारा वैद्य कुटुंबीयांच्या पंचमुखी मुखवट्याचा पालखी सोहळा संपन्न होणार आहे. यासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता चारही सोमवारसाठीचे विशेष नियोजन करण्यात आले आहे. प्रथेनुसार दुपारी अडीच वाजता पंचमुखी कपालेश्वर मंदिरात नेण्यात येणार असून दुपारी चार वाजेच्या सुमारास कपालेश्वर मंदिरातून या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. तर संध्याकाळी सात वाजता रामकुंडावर महापूजा बांधली जाणार आहे.

गेल्या १२६ वर्षाची वैद्य कुटुंबीयांनी अखंडपणे ही परंपरा चालवत आले आहे. या पालखी परंपरेत खंड पडू नये म्हणून कै. दादाजी उमाशंकर वैद्य यांनी ६ नोव्हेंबर १८९३ रोजी धनोत्रयोदशीला दि कपालेश्वर पालखी प्रोसेशन ट्रस्टची स्थापना केली. तेव्हापासून वैद्य कुटुंबीयांकडे पंचमुखी सेवेचा वारसा लाभला आहे. सध्या अरविंद ठाकूरलाल वैद्य आणि जगदीश ईश्वरलाल वैद्य यांच्याकडे पालखी सोहळ्याची जबाबदारी आणि नियोजन असते. तर सुहास अरविंद वैद्य आणि मनोज वैद्य या पालखी सोहळ्याची अंमलबजावणी करतात. सदरचा पंचमुखी महादेवाचा मुखवटा वर्षभरातील सर्व सोमवती अमावस्या, श्रावणी सोमवार आणि महाशिवरात्र या दिवशी कपालेश्वराच्या मंदिरात आणला जातो.  वैद्य कुटुंबीयांच्या परंपरेनुसार चांदीच्या पंचमुखी महादेव मुखवट्यांची पालखी काढली जाते. सुरुवातीला सकाळी अरविंद वैद्य पंचमुखी महादेवाची पूजा करतात. त्यानंतर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पंचमुखी कपालेश्वर मंदिरात आणली जाते. त्यानंतर पालखी फुलांनी सजवून सवाद्य पालखी सोहळ्याला सुरुवात होते. साधारपणे साडेचार वाजेच्या सुमारास पालखी निघते. यावेळी पालखी मार्गात ठिकठीकाणी रांगोळ्या काढून पालखीचे स्वागत करण्यात येते. तर शेवटच्या टप्प्यात फुलांची हंडी बांधण्यात येते. सदरची पालखी कपालेश्वर मंदिरातून निघून मालवीय चौक, शनी चौक, राममंदिर पूर्व दरवाजा येथे येते. येथे काळाराम मंदिरातर्फे पालखीची पूजा होते. त्यानंतर पालखी सरदार चौक, मुठे गल्ली पुन्हा शनी चौकातून रामकुंडावर सात वाजेच्या दरम्यान आणली जाते. आणि तिथे पूजा बाधली जाते. या ठिकाणी रामकुंडावर दुध, दही, मध, उसाचा रस याचा अभिषेक करण्यात येतो. सुमारे पाच ते सहा तासांची ही महापूजा असते. त्यानंतर महाआरती झाल्यानंतर पंचमुखी पुन्हा एकदा मंदिरात नेली जाते.  तिथे पुन्हा एकदा रात्री बारा वाजता पुन्हा एकदा पूजा केली जाते. त्यानंतर पुन्हा सकाळी उत्तर पूजा केल्यानंतर सदरचा मुखवटा वैद्य कुटुंबीयांकडून घरी नेण्यात येतो. पुन्हा विधीवत पूजा करून देव्हाऱ्यात मुखवट्याची स्थापना केली आहे. तरी भाविकांनी या पालखी सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन वैद्य कुटुंबीयांनी केले आहे

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “श्री कपालेश्वर : पंचमुखी महादेव पालखी सोहळापंचमुखी महादेवाच्या पालखी सोहळ्याची तयारी पूर्णत्वाकडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.