कानडे मारुती लेन : निवासी इमारतीत अनधिकृत गाळे सील; नोटीस दिल्यानंतर दीड वर्षांनी कारवाई

जुने नाशिक : कानडे मारूती लेनमधील विघ्नहर्ता संकुल याइमारतीत निवासी उपयोग करण्यासाठीची परवानगी घेत बांधलेल्या इमारतील अनधिकृतपणे १० गाळे निर्माण करण्यात आले होते. हे बांधकाम पूर्णपणे अनधिकृत असल्यामुळे इमारतीतील दहा गाळे व्यावसायिकांच्या कोट्यवधींच्या मालासह सील केले आहेत. Kanade Maruti Lane unauthorized shops residential building commercial use sealed

हे गले अनधिकृत असल्याच्या तक्रारी मनपाला दीड वर्षापूर्वी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर महापालिकेच्या नगररचना विभागाने संबंधितांना या गाळ्यांचा अर्थात इमारतीचा वाणिज्य वापर बंद करण्याच्या अंतिम नोटीसा २९ ऑक्टोबर २०१६ रोजी बजावल्या होत्या. परंतू त्यानंतरही संबंधित गाळेधारक व्यावसायिकांनी कोणतीही हालचाल केली नाही. त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. Kanade Maruti Lane unauthorized shops residential building commercial use sealed

या प्रकारामुळे इमारतींचा बेकायदा वापर करणाऱ्यांना जोरदार दणका बसला आहे. शहरातील अन्य भागातही अशाच प्रकारची कारवाई केली जाणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरीक्त आयुक्त किशोर बोर्डे यांनी दिली. नाशिक महापालिकेचे पश्चिम विभागीय अधिकारी नितीन नेर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. Kanade Maruti Lane unauthorized shops residential building commercial use sealed

या व्यावसायिकांच्या मालासह गाळे झाले सील :

रवी बॅग हाऊस, साखरीया सोलंकी, रुपाली जनरल स्टोअर्स, जयशंकर ट्रेडर्स, मामा जनरल स्टोअर्स, रुपाली नॉव्हेल्टीज, कलश आर्ट

अनधिकृत : आर्थिक फायदा घेणाऱ्या तळघरातील मालमत्तांवर होणार कारवाई

महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे यांनी अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामा विरोधात कारवाईची मोहिम उघडली आहे. रस्त्यांवरील विक्रेत्यांविरोधात अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करतानाच बड्या पक्क्या बांधकामांवर देखील त्यांनी हातोडा मारण्यास सुरूवात केली आहे.

अनधिकृत लॉन्सवर कारवाई सुरु

औरंगाबाद रोड सह विविध भागात वाहतूक कोंडीची मुख्य कारण ठरलेल्या अनधिकृत लॉन्स आणि मंगल कार्यालयांविरोधात महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. नगररचना विभागाने केलेल्या सर्वेक्षणात १६२ लॉन्स, मंगल कार्यालये अनधिकृत असून त्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. Kanade Maruti Lane unauthorized shops residential building commercial use sealed

अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचे धोरण शासनाने आखले असून, त्यासाठी ३१ मे अखेरची मुदत आहे. या मुदतीत लॉन्सधारकांना ते अधिकृत करण्याची संधी आहे. त्यानंतर पालिकेकडून अनधिकृत बांधकामे काढण्याची कारवाई केली जाणार आहे.

शहरातील विविध निवासी इमारतींमधील तळघरांचा बेकायदेशीरपणे आर्थिक फायदा घेणाऱ्या मालमत्तांवर नाशिक महानगरपालिका कारवाई करणार आहे. यात १२६ दुकाने, १०६ गोदामे, २५ हॉटेल्स व ४७ इतर अशा एकूण ३०४ आस्थापनांचा समावेश आहे. या कारवाई विषयी संबंधितांना महापालिकेच्या नगररचना विभागामार्फत अंतिम नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या मालमत्तांवर पुढील कारवाईसाठी करण्यासाठी नगररचना विभागाने अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे प्रस्ताव पाठवला आहे.

Kanade Maruti Lane unauthorized shops residential building commercial use sealed

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi and your  name and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.