अभियंत्यास ६० हजारांची लाच घेताना अटक

अभियंत्यास ६० हजारांची लाच घेताना अटक
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक येथील रस्ते सुधार योजनेसाठी कनिष्ट अभियंत्यास ६० हजार रुपयांची लाच स्विकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज अटक केली आहे.
नांदगाव पंचायत समिती अंतर्गत मौजे मूळ डोंगरी ग्रामपंचायत येथील तांडा सुधार  वस्ती योजनेतील रस्त्याचे काम सुरु आहे. शासनाने त्या करिता निविदा समाजकल्याण विभागाने मंजूर केली आहे.सदर कामाची मुल्यांकन पुस्तिका भरून दिली गेली होती.तर १३ व्या वित्त आयोगाच्ची मुल्यांकन पुस्तिका भरून देण्यासाठी अभियंता देविदास तुकाराम पवार यांनी तक्रारदार यांच्या कडे एकूण १ लाख रुपये मागणी केली होती. यावर तक्रारदर यांनी आपली तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केली.विभागाने आज सापळा रचला आणि नांदगाव-चाळीसगाव   या मार्गावरील  असलेल्या हॉटेल जत्र येथे तक्रारदार यांच्या कडून सुमारे ६० हजार रुपये स्विकारताना पोलिसांनी अटक केली आहे.

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *