Jayshreeram : बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाची माती घेऊन शिवसैनिक अयोध्येत दाखल

राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी देशाच्या विविध कानाकोपर्‍यातून पवित्र जल आणि माती अयोध्येत आणली जात आहे. यासोबतच अध्यात्मिक आणि धार्मिक महत्व असलेल्या वस्तूही राम जन्मभूमी ट्रस्टकडे सुपूर्द केल्या जात आहे. तर आता अयोध्येत शिवसेनेलाही नारा घुमताना दिसत आहे.Jayshreeram

हिंदुहृदयसम्राट तथा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरची माती घेऊन शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत. मीरा भाईंदर महापालिकेतील शिवसेना नगरसेवक आणि जिल्हाध्यक्ष विक्रम प्रताप सिंग हे ही माती घेऊन अयोध्येत दाखल झाले. शरयू तीरावर ही माती ठेऊन त्यासमोर 492 दिवे लावणार आहेत. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे दूत म्हणून विक्रम प्रताप सिंह अयोध्येत आले आहेत.

“राममंदिराचं भूमिपूजन होत असल्यानं बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकार झालं आहे. त्यानिमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील अयोध्येला तीन वेळेस येऊन गेले आहेत. त्यामुळे राम मंदिरात शिवसेनेनचं योगदान खूप मोठं आहे. त्यासाठी शिवसेना आपल्या पद्धतीनं मंदिराच्या भूमिपूजनाचा आनंद व्यक्त करणार आहे”, असं विक्रम प्रताप सिंग यांनी सांगितलं.Jayshreeram

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.