चोरांचे धाडस : अप्पर पोलीस अधीक्षकांच्या घरी घरफोडी

जळगाव जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या घरावर दरोडा

धाडसी घरफोडी ,६.५ लाखांचा ऐवज लंपास

नाशिक : जळगाव जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील  घरावर दरोडा पडला आहे. मालेगाव तालुक्यातील कौळाणे येथे अज्ञात चोरटयांनी घरफोडी केली असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील दोन दिवसात किमान ५ घरांवर घरफोडी झाली असल्यामुळे तालुक्यातील पोलिसांची झोप उडाली आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून कारवाई सुरु केली आहे.

काल रात्री दरोडेखोरांनी चक्क कौळाणे गावात जळगाव जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या घरावर दरोडा टाकून घरातील दाग-दागिने व रोख रकमेसह सुमारे सहा लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल चोरून नेला, चक्क एका पोलिसांच्या घरावरच दरोडा टाकून चोरटयांनी तालुक्यातील पोलिसांची झोप मोडून टाकली आहे. दरम्यान मालेगाव तालुका पोलिस निरीक्षक शिंगटे आणि पथकातील अंकुश बोराटे, हिरे, नितीन पांढरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे आणि पुढील तपास करीत आहे.

तालुका पोलिसांना तपास करतांना आढळले की चोरटयांनी जळगाव जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या घरावर दरोडा टाकून कौळाणे येथील जैन मंदिरात सुद्धा आपला हात साफ करण्याचा प्रयत्न केला होता परंतु मंदिरात काही आढळले नसल्यामुळे अज्ञात चोरटे तेथून परत गेले.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.