IPSचे स्वप्न पाहत कर्करोगाच्या अवघड शस्त्रक्रियेस सामोरे जाताना सागरला भेटला त्याचा ‘हिरो’ विश्वास नांगरे पाटील

स्वप्न ही मोठी असतात ते सत्यात उतरवायला आपण सर्व फार मेहनत घेतो, त्या साठी आपण झगडतो . मात्र जर नियतीला हे मान्य नसेल तर मात्र आपण काहीच करू शत नाही. तरीही असे या जगात अनेक वीर आहेत ते नियतीसोबत झुंज देतात आणि आपल्या सर्वाना लढायची प्रेरणा देतात, असाच प्रवास आहे सागरचा. उराशी आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले त्यासाठी त्याने मेहनत देखील केली मात्र त्याला कर्करोग झाला. यामुळे त्याला त्याचा पाय गमवावा लागणार आहे. त्याला पायाचा कर्करोग झाला आहे. मात्र तरीही तो लढतो आहे, मात्र त्याला प्रेरणा हवी होती, पाठीवर फक्त हात हवा होता त्याला फक्त “लढ” म्हणण्यासाठी. त्याने ती इच्छा केली त्याचा हिरो, आयडल असलेले नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना भेटण्याची. पाटील सर वेळ न दडवता आले त्याला हात देत लढण्यासाठी शक्ती आणि प्रेरणा देऊन गेले.

पोलीस आयुक्त श्री विश्वास नांगरे पाटील यांनी घेतली मानवता क्युरी हास्पीटल येथे सागर बोरसे याची भेट 
IPS अधिकारी बनण्या चे स्वप्न उरी बाळगत कर्करोगाशी झुंग देणाऱ्या सागरला त्याच्या आवडत्या महानायकाकडून भेट, दिला IPS अधिकारी दर्जा !

आज दिनांक २७ जून रोजी आपले नाशिक शहराचे आवडते पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पुन्हा एकदा शहराला नव्हे तर माणुसकीला शोभेल असे एक उदाहरण समोर केले, निमित्त होते ते एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर मधील एक पेशंट चि. सागर बोरसे याच्या इच्छेचे आणि ऑपरेशन पूर्वी व्यक्त केलेली इच्छा.

सागरच्या पायाला झालेल्या कॅन्सरमुळे आज त्याचा पाय गुडघ्यापासून काढण्याची शस्त्रक्रिया होती. सागरला आयुष्यात आयपीएस ऑफिसर बनायचे आहे. पण काळाने घातलेला घाला आणि त्यावर कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने थोड्या वेळासाठी का होईना पण मिळवलेला विजय यावर मात म्हणून सागरची असलेली प्रबळ इच्छाशक्ती हेच एक जिवंत उदाहरण. सागर ने डॉक्टर राज नगरकर यांच्याकडे एक इच्छा व्यक्त केली ती होती आपले नायक पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील यांना भेटण्याची. डॉ. राज नगरकर यांनी क्षणाचाही विलंब न करता पोलीस आयुक्त नांगरे पाटील यांना फोन केला व सागरला भेटण्याची विनंती केली.

पोलीस आयुक्त नांगरे पाटील यांनी लगेचच येण्याचे आश्वासन दिले पुढच्या पाच मिनिटात मानवता कॅन्सर सेंटर येथे हजर झाले. जेथे सागरचे स्वप्न आयपीएस अधिकारी होऊन समाजाची सेवा करायचे होते, त्या ठिकाणी त्याचे मनोबल घटता कामा नये म्हणून सरांनी त्याला आयएएस होण्याचा सल्ला दिला त्याचे मनोबल वाढवले.

सागरला भेटल्या भेटल्या त्याचे मनोबल वाढवत त्याला “आयपीएस नव्हे तर तू आयएएस अधिकारी जरूर होशील” अशी शुभकामना दिली आणि सागराप्रमाणे या समाजाचे दुःख दूर करत विविध व्यथेने ग्रासलेल्या लोकांची मदत करशील याचा विश्वास दिला. त्याला पुढील आयुष्यात मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले, एवढ्यावरच न थांबता पोलीस आयुक्त यांनी आपल्या डोक्यावरील टोपी आणि लाठी त्याच्या हातात देत त्याचे मनोबल वाढवले. पोलीस आयुक्त यांनी डॉक्टर नगरकर यांचे या आगळ्यावेगळ्या उपक्रमात त्यांना सहभागी करून घेतल्या बद्दल धन्यवाद दिले. हॉस्पिटल मधील सर्व रुग्णांच्या नातेवाईकांनी व कर्मचारीवृद ने या घटनेचे स्वागत केले.

Nashikonweb.com या नाशिकच्या डिजिटल वेबपोर्टलला बातमी देण्यासाठी कृपया या दोन क्रमांकावर संपर्क करा : Whata App and Call : 9689754878 and 8830486650

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.