असहिष्णुता सत्य कि आभास? रविवारी खा. स्वामींचे नाशकात व्याख्यान

भ्रामक असहिष्णुतेच्या षड्यंत्राचा होणार पर्दाफाश?

नाशिक : हिंदुस्थान प्रकाशन संस्था आणि शंकराचार्य न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात राज्यसभेचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांचे ‘विवेक संवाद’ कार्यक्रमांतर्गत ‘असहिष्णुता सत्य कि आभास’ या विषयावर प्रकट व्याख्यान होणार आहे. रविवार दि. १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता गंगापूर रोडवरील शंकराचार्य न्यासाच्या कुर्तकोटी सभागृहात हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

intolerance reality semblance dr subramanyam swami's lecture sunday nashik

या निमित्ताने नाशिककरांच्या वतीने महापौर सौ.रंजना भानसी यांच्या हस्ते डॉ. स्वामी यांचा सत्कार करण्यात येणार आहे तसेच घटनेतील मुलभूत अधिकार पुनर्स्थापित करण्यासाठी आणीबाणीत कारावास भोगलेल्या सत्यागृहींचा प्रातिनिधिक सत्कार देखील करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहणायचे आवाहन आयोजक हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, विश्वस्त रमेश गायधनी तसेच शंकराचार्य न्यासाचे अध्यक्ष डॉ.आशिष कुलकर्णी यांनी केले आहे.

डॉ. सुब्रमण्यम स्वामी :

डॉ. स्वामी हे भाजपचे राज्यसभेचे खासदार असून ते भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राहिले आहेत. हार्वर्ड विद्यापीठातून अर्थशास्रात पदवी घेतल्यानंतर त्यांनी इंडेक्स नंबर थेअरी मध्ये विशेष संशोधन कार्य केले आहे. ते आता हार्वर्ड युनिवर्सिटीचे फॅकल्टी सदस्यही आहेत.

१९७५ साली लागलेल्या आणीबाणीबाबत सर्वाधिक आधी कुणकुण लागलेल्या डॉ. स्वामी हे आणीबाणीच्या काळात सहा महिने भूमिगत होते. नंतर त्यांनी अमेरिकेत जात भारतीयांच्या मनात आणीबाणीबद्दल जागरूकता निर्माण केली. नंतर भारतीय संसदेत जगभरातील पत्रकारांसमोर दोन मिनिटांच्या भाषणात ‘भारतात लोकशाही मेली आहे’ असे बोलून नेपाळ मार्गे पुन्हा अमेरिकेत परतले. या घटनेनंतर ते आणीबाणीचे नायक म्हणून उदयास आले.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.