नाशिक : इंटरनेट सेवा पूर्ववत, महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासन

Share this with your friends and family

नाशिक जिल्ह्यात शेतकरी संपाचा वाढता प्रभाव पाहता आता सायबर पोलिसांनी कडक पावले उचलत मोबाईल इंटरनेट सेवा बंद काही काळासाठी बंद केली होती.  मात्र काहीवेळा नंतर लगेचच सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सर्व मोबाईल ग्राहकांची इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. व्हाट्सऍप व तत्सम मेसेजिंग ऍप च्या आधारे लोकांना संपाबाबत अफवा पसरू लागल्या होत्या. त्याचप्रमाणे संप संदर्भातील प्रशासनाने विविध कारवाया करणे चालू आहे. त्याबाबत माहिती पसरून संपाची तीव्रता वाढण्याची शक्यता होती. संप बाबतच्या पोस्ट व्हायरल होत असल्याचे कारण देत हे पाऊल उचललेले असे प्रशासन सांगत आहे.

सेवा पूर्ववत झाल्याचे एसएमएस सर्व मोबाईल कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना पाठवला आहे. या माध्यमातून संपामध्ये केली जात असलेली अशांततेच्या वातावरणावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोमवारी जिल्ह्यात काही ठिकाणी संपला हिंसक वळण आले यामध्ये रस्ता रोको, चक्क जाम, सार्वजनिक मालमत्ता मोडतोड आणि सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न दिसून आला आहे.

महाराष्ट्रात दुसऱ्या वेळी  इंटरनेट सेवा बंद

दरम्यान, मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्याची महाराष्ट्रातील ही दुसरी  वेळ आहे.यापूर्वी नाशिक येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला तेव्हा ६ दिवस इंटरनेट बंद होते. यापूर्वी जम्मू-काश्मीर, गुजरातमध्ये इंटरनेट सेवा बंद केली होती. बुरहान वाणीच्या खात्म्यानंतर काश्मीर खोऱ्यात उसळलेल्या दंगलीनंतर काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद होती. तर गुजरातमध्ये हार्दिक पटेलच्या नेतृत्त्वातील पटेल आंदोलदरम्यान इंटरनेट सेवा ठप्प होती.

_____________________

नाशिक मधील घडत असलेल्या घटना,महिती आणि योग्य वस्तुस्थिती मांडण्याकरीता आम्ही www.nashikonweb.com  हे डिजिटल वेब पोर्टल सुरु केले आहे. यामध्ये नाशिक,उत्तर महाराष्ट्र,राज्य तसेच इतर बातम्या महितीचा समावेश केला आहे. तर आजच्या दिवशी घडणारी घटना लगेच आणि विश्वसनीयतेने बघता यावी याची पूर्ण काळजी आम्ही घेतली आहे. तरी आमच्या डिजिटल न्यूज वेब पोर्टल वर आपली माहिती,प्रेस नोट,प्रसिद्धी पत्रक, कार्यक्रम,आपल्या आजूबाजूला घडणारी घटना, सत्कार, सभारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ, कृषी, व्यक्ति विशेष, संस्था त्यांची माहिती, चांगले कार्य, समाज सेवक कार्य, आपल्या परिसरातील समस्या आणि इतर सर्व जे आपल्याला आम्हाला न्यूज पोर्टल म्हणून सांगावे वाटेल ते सर्व आपण आम्हाला कळवू शकता.या सर्व गोष्टी‍ंची दखल तर घेवूच तर माहिती लाखो वाचकापर्यंत पोहचवू तसेच प्रशासन, शासन यांना दखल घेणे भाग पाडू हा विश्वास आम्ही देतो.

प्रसिद्धी पत्रक, निमंत्रण आणि इतर महिती तसेच जहिरात माहिती करिता आपण इमेलच करावा असा आमचा आग्रह आहे.

आम्ही आपल्या करिता सर्व स्तरावर उपलब्ध आहोत. आपण वेबसाईटला व्हिजीट करत तेव्हा सु तुम्ही तुमची प्रतिक्रिया तेथे थेट नोंदवू शकता, तर इतर महिती पुढील प्रमाणे आहे.

www.nashikonweb.com on Social media please Follow and Like page

E-mail id    :- nashikonweb.news@gmail.com ,Twitter :- https://twitter.com/nashikonweb

Facebook   :- https://www.facebook.com/NashikOnWeb/

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.