Photo GL:किडा महोत्सव: नाशिककरांनी समजून घेतले कीटक, मधमाश्यांचे जैविक महत्व

देश आणि राज्यातील पहिलाच इंसेक्ट अॅण्ड बायोडायवर्सिटी फेस्टिवल संपन्न, प्रत्यक्ष पाहिले अनेक कीटक, फुलपाखरे, भुंगे आणि मधमाश्या

नाशिक : दैनदिन जीवनात भुंगे, मुंग्या, मधमाश्या, फुलपाखरे आदी लहान मोठ्या स्वरूपात ‘किटक’ दिसतात. नागरीकांमध्ये त्याच्याबाबत असलेल्या अज्ञान आणि भीतीमुळे त्यांना मारले जाते. मात्र यामुळे पर्यावरणाची एका प्रकारे हानीच होते. ही गोष्टी मुळीच लक्षात घेतली जात आहे. मधमाश्यांची कमी होणारी संख्या धोक्याची पूर्व सूचना असून याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. नेमकी हीच गरज ओळखून रोटरी क्लब ऑफ नाशिक, नॉर्थ आणि ग्रेप काउंटी बायोडायवर्सिटी पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने देश आणि राज्यातील पहिला इंसेक्ट अॅण्ड बायोडायवर्सिटी फेस्टिवल अर्थात किटक आणि जैव विविधता महोत्सव पार पडला. Insect Festival Kidaa Mahotsav Biodiversity Rotary Nashik North Grape County

नाशिक शहरालगत असलेल्या त्र्यंबकेश्वर रोड येथील ग्रेप काउंटी बायोडायवर्सिटी पार्कमध्ये सदरचा महोत्सव संपन्न झाला. यानिमित्ताने नाशिकला लाभलेली जैवसंपदा नागरिकांनी पाहिली. यात विविध प्रजातीची किटके, भुंगे, मधमाश्या, पतंगे आदींना पाहून त्यांची माहिती उपस्थितांनी करून घेतली.

Insect Festival Kidaa Mahotsav Biodiversity Rotary Nashik North Grape County Kadam Sir
मधमाशी त्यांचे पोळे दाखवत असतांना मधुमक्षिका तज्ञ  टी.बी. निकम

या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थचे अध्यक्ष मनिष ओबेरॉय आणि ग्रेप काउंटीचे संचालक किरण चव्हाण, तेजस चव्हाण यांच्यासह अक्षय धोंगडे, राजेश पंचाक्षरी, प्रशांत सारडा, सुरेश सूर्यवंशी, अनिल साखरे, राजेंद्र धारणकर,  यांनी मेहनत घेतली आहे. तर पी डी जी दादा देशमुख, रमेश मेहेर, सुरेश शिंदे,आशा वेणुगोपाल, नरेश शहा सोबतच या उपक्रमासाठी शहरात असलेले रोटरीचे १६ क्लब यांनीही पुढाकार घेतला. या उपक्रमास पोलिस डीसीपी माधुरी कांगणे उपस्थित होत्या. Insect Festival Kidaa Mahotsav Biodiversity Rotary Nashik North Grape County

महोत्सवाच्या सुरुवातीला मधुमक्षिका तज्ञ टी.बी. निकम यांनी मधमाशांवर आधारीत चित्रफीत दाखवली. वाढत्या प्रदुषणामुळे पर्यावरणात शत्रू कीटकांची संख्या झपाट्याने वाढत असुन मधमाश्यांसारख्या मित्र कीटक कमी होत आहे. या मधमाश्या संपल्या तर अवघ्या चार वर्षात मनुष्यसृष्टी संपेल. त्यामुळे आता ‘मधुक्रांती’ ची गरज असल्याचे  निकम यांनी सांगितले.

या विषयावर अधिक माहिती देतांना किटके परागवहनाचे महत्वाचे काम करत असून त्याच्या मदतीने अन्नसाखळी पूर्ण होत असल्याचे पक्षी तज्ञ डॉ. श्रीश क्षीरसागर यांनी सांगितले. यासोबत कीटक संवर्धनाची सुरुवात घरापासून करायला हवी. त्यांना मारू नये. झाडाजवळ असलेल्या याच मुंग्या आणि कीटकांमुळे झाडाला मदत होते. हे लक्षात घ्यायला हवे  असे किटक तज्ञ अभिजित महाले यांनी स्पष्ट केले. Insect Festival Kidaa Mahotsav Biodiversity Rotary Nashik North Grape County

या महोत्सवा मागची भूमिका स्पष्ट करतांना रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थचे अध्यक्ष मनिष ओबेरॉय यांनी सांगितले की, रोटरी नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेते. याचाच एक भाग म्हणून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. आता पर्यावरण संवर्धन म्हणजे काय , यात कुठल्या कुठल्या गोष्टीचा समावेश होतो हे समजवून सांगत आहे.

यापुढे दरवर्षी हा महोत्सव भरविला जाणार असल्याची त्यांनी माहिती दिली. तर मुले शाळेत पुस्तकांमधून पर्यावरण समजून घेतात. मात्र या निमित्ताने पर्यावरण अनुभवण्याचाही आनंद घेता आला असे ग्रेप काउंटीचे संचालक किरण चव्हाण यांनी सांगितले. Insect Festival Kidaa Mahotsav Biodiversity Rotary Nashik North Grape County

महोत्सवात पाहिलेली जैवसंपदा

मधमाशा : इटालियन, फुलोरी, आगी,ट्रोकीना (डंख न करणाऱ्या माश्या), सॉलिटर बी (एकटी राहणारी माशी).

फुलपाखरे : कॉमम क्रो, प्लेन टाईगर,कॉमन टाईगर, हेज ब्लू, ड्रॅगन फ्लाय , ग्रास यलोची अनेक जाती, सोबतच अनेक पतंगे.

पक्षी : ब्लॅक ड्रँगो, पेड बुशचॅट, जंगल मायना, ब्राह्मणि माइना, क्रेस्टेड लार्क, रुफस टेल लार्क, मॅग्पी रॉबिन, इंडियन रॉबिन, पर्पल सनबर्ड, रेड वॅटलेड लॅपिंग,लाफिंग डोव, एग्रीट्स आणि हेरॉन्स, किंगफिशर्स.

किटके : ग्रासहूपर, कॅटेडीडस, बीटल्स, ड्रॅगनफ्लाईज, डॅमस्लिज, बग्स, विविध

फुलपाखरे, पतंग, वृक्षापोटी, मुंग्या, हनीबीज, वापास, प्रीईंग मांटिस,  वोकिंगस्टिक,वॉटर स्ट्रर्ड, एंटलायन.

अॅक़्वाटीग बीटल्स, बर्गल्स, भुंग्याच्या विविध प्रजाती, बग अर्थात झाडावर ढेकुण.

याशिवाय रेन ट्री, कांचन, आवळा, बाभूळ, पिंपळ, गुलमोहर , शिसम, सिल्वर ओक, बॉटल ब्रश, उंबर, चिंच, पळस आदी झाडे पाहिली.

Insect Festival Kidaa Mahotsav Biodiversity Rotary Nashik North Grape County
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.