भाजपच्या दोन नगरसेवकांच्या वाहनांची तोडफोड

नाशिक : नाशिकमध्ये भाजपच्या दोन नगरसेवकांच्या वाहनांची मध्यरात्री तोडफोड करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रातील  प्रभाग ३० चे नगरसेवक  सतीश सोनवणे आणि दीपाली कुलकर्णी यांच्या वाहनांची तोडफोड झाली आहे.Indiranagar Bjp Corporators car glass broke unknown person late night  

मध्यरात्री सव्वा वाजेच्या सुमारास नगरसेविका कुलकर्णी यांच्या अजय मित्र मंडळाच्या मैदानाजवळ असलेल्या साईश्रद्धा अपार्टमेंटच्या बाहेर उभ्या केलेल्या गाडीच्या काचेवर लाकडी दंडुक्यांचा प्रहार झाला. आवाजामुळे त्यांचे पती सचिन कुलकर्णी यांना जाग आली. त्यांनी खाली पाहिले असता पांढऱ्या रंगाची ऍक्टिवा आणि सीडी डॉन दुचाकीद्वारे आलेले चौघे त्यांना दिसले. कुलकर्णी खाली येईपर्यंत गाडी फोडणाऱ्यांनी त्यांनी पळ काढला.

त्यानंतर अर्ध्यातासातच राजीवनगर येथील कोहिनूर कॉलनीमध्ये राहणारे नगरसेवक सतीश सोनवणे यांच्या निवासस्थाना बाहेर लावलेल्या त्यांच्या गाडीच्या  काचा फोडण्यात आल्या. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज नुसार दोन्ही ठिकाणी तोडफोड करणारे सारखेच असल्याचे प्रथमदर्शी दिसून आले आहे. लवकरच गुन्हेगारांना अटक करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.

Connect with Us on WhatsApp : 9689754878, 8830486650 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “भाजपच्या दोन नगरसेवकांच्या वाहनांची तोडफोड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.