भाजपा नगरसेवकांच्या गाड्या तोडफोड प्रकरण; भाजपाच्याच माजी नगरसेवकाला अटक

नाशिकमध्ये भाजपच्या दोन नगरसेवकांच्या वाहनांची मध्यरात्री तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली होती. महापालिका क्षेत्रातील  प्रभाग ३० चे नगरसेवक  सतीश सोनवणे आणि दीपाली कुलकर्णी यांच्या वाहनांची तोडफोड झाली. Indiranagar bjp corporators car breakdown case former bjp corporator arrested

याप्रकरणी भाजपच्याच माजी नगरसेवक आणि सध्याचे झेरॉक्स नगरसेवक असलेल्या सुनील खोडे मुख्य सूत्रधार असलायचे पोलीस तपासात समोर आले असून या प्रकरण खोडे यांना आज सकाळी (शुक्रवार दि. १३) अटक करण्यात आली. त्यांना तत्काळ जामीनही मिळाला आहे.

इथे वाचा कशी घडली होती तेव्हा ही घटना : दि. ५ एप्रिल : भाजपच्या दोन नगरसेवकांच्या वाहनांची तोडफोड

यामुळे कलाटणी मिळालेल्या या प्रकरणामागे विकास कामांचा श्रेयवाद आणि त्यातून उफाळलेली भाजपचीच अंतर्गत गटबाजीतून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, खोडे यांची भाजपातून हकालपट्टी करण्याची मागणी गाड्यांची तोडफोड झालेल्या नगरसेवकांनी केली आहे. Indiranagar bjp corporators car breakdown case former bjp corporator arrested

मुख्य संशयिताला अटक केल्यानंतर त्यानेच दिली ही कबुली…

परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या या घटनेनंतर सीसीटीव्ही फुटेज तपासून इंदिरानांगर पोलिसांनी शयित ओमकार मैंद याच्यासह दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले होते. तर दोन दिवसांनी यातील फरार असलेला मुख्य संशयित प्रीतम उर्फ डॅनी प्रकाश गोडसे (रा पांडवनगरी) यास अटक केल्यानंतर त्याने सुनील खोडे यांच्या सांगण्यावरूनच ही तोडफोड केल्याचे सांगितले. त्यानंतर खोडे आज सकाळी आठ वाजता स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाल्याने अटक करण्याची कारवाई करण्यात आली.

सतीश सोनवणे यांच्या घराबाहेर उभी असलेल्या इनोव्हा कारच्या (एमएच १५ डीवाय ६३६०) तसेच रथचक्र चौकातील साईश्रद्धा अपार्टमेंटमधील रहिवासी नगरसेवक दीपाली कुलकर्णी याच्या वोक्सवॅगन वेन्टो (एमएच १५ ईएक्स ६६५५) कारच्या गुरुवारी (दि़ ५) मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास चार समाजकंटकांनी काचा फोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. ही सर्व घटना सी सी टी व्ही मध्ये कैद झाली होती.

Indiranagar bjp corporators car breakdown case former bjp corporator arrested

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा !

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.