कांदा व्यापारी वर्गावर प्राप्तिकर विभागाचे छापे, दिवसभर कारवाई सुरु

 कांदा भावात होत असलेली मोठी वाढ, तर कांदा पिकवत असलेल्या शेतकरी वर्गाला होत नसलेला फायदा हे सर्व पाहत  प्राप्तिकर विभागाने या क्षेत्रातील व्यापाऱ्यांकडे तपास सुरु केला आहे. लासलगाव, येथील कांदा व्यापाऱ्यांवर छापे टाकून त्यांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी केलीय.नाशिक जिल्हायात कांद्याची आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासगावातील दोन, चांदवडमधील एक, सटाणा येथील एक तर पिंपळगाव बसवंत येथील एक कांदा निर्यातदार, उमराणे येथील एक व येवला येथील एका मोठ्या व्यापाऱ्यावर आयकर धाडसत्र झाले.

याचा निषेध करत उद्या १४ सप्टेंबर रोजी बाजार समिती व्यवहार बंद होणार असून, जवळपास ३०० नवीन ट्रक भरून कांदा लिलावासाठी आला आहे. आजच्या कारवाईत सतीश लुंकड सटाना, खंडू देवरे उमराणे, प्रवीण हेडा चांदवड, ओमप्रकाश राका लासलगाव, संतोष अटल येवला,क्रांतीलाला सुराणा लासलगाव, मोहनलाल भंडारी पिंपळगाव यांच्यावर कारवाई केली आहे.सदर व्यापारी वर्गाने साठवलेला कांदा जप्त केला असून त्याची मोजणी सुरु आहे.

पूर्ण देशात  किरकोळ बाजारात कांदा भाव हा  ४० ते ५० रूपयांची पवाढ झाली होती. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने यामागे साठेबाजी आहे का, याचा शोध घेण्यास सुरूवात केलीय. कांद्याची साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही दिला गेला होता. मात्र त्याचा काहीच परिनाम दिसला नाही. शेवटी यावर अंकुश लावण्यासाठी केंद्राने पाऊल उचलले आहे.

जुलै महिन्यामध्ये चारशे ते पाचशे रुपये प्रतिक्विंटल विक्री होणारा कांदा ऑगस्ट महिना पर्यंत २५०० रुपये दराने विक्री झालेला होता.एकाच महिन्यात कांद्याचे पाचपट भाव वाढल्याने शहरी भागांमध्ये दहा रुपये किलो विकला जाणारा कांदा चाळीस ते पन्नास किलोने विकला गेला.

एका महिन्यात जमिनीवर असलेले कांद्याचे दर आकाशाला भिडविना-या व्यापा-यांवर आयकर विभागानंधाडी टाकल्या. आयकर विभागाच्या टीमने लासलगाव येथील दोन कांदा व्यापाऱ्यांवर सकाळपासून कसून चौकशी सुरू आहे .

कांदा आयात केल्याने कांद्याचे दर एका महिन्याच्या तुलनेत एक हजार रुपयाने घसरलेले आहे.परिणामी धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी आपल्याकडे शिल्लक असणारा कांदा विक्रीसाठी आणला होता.  यामुळे घाऊक बाजारात भाव काहीसे खाली आले होते. तरी मात्र ग्राहकाला किरकोळ बाजारात वाढतच होते.

मात्र त्यात  गुरुवारी प्राप्तिकर विभागाच्या वेगवेगळ्या पथकांनी जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव बसवंत, चांदवड,येवला,सटाणा  येथील कांदा व्यापाऱ्यांवर छापे टाकले. लासलगाव येथील राका  एक्सपोर्ट आणि साईबाबा ट्रेडिंग कंपनी  या व्यापाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी केली. सकाळी ८ वाजे पासून हे काम  चाललेले होते. नियमित स्वरूपाची ही तपासणी असल्याचे सांगून फारसे काही बोलण्यास संबंधित अधिकाऱ्यांनी नकार दिला. याच पद्धतीने पिंपळगाव बसवंत, चांदवड,येवला,सटाणा येथील काही व्यापाऱ्यांच्या व्यवहारांची तपासणी करण्यात आली.

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “कांदा व्यापारी वर्गावर प्राप्तिकर विभागाचे छापे, दिवसभर कारवाई सुरु

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.