नोट प्रेसमध्ये संगणिकृत इंटेग्लिओ प्रिंटिंगसाठी अत्याधुनिक मशिनचे उद्घाटन

नाशिक : येथील करेंन्सी नोट प्रेस येथे संगणकाद्वारे अत्याधुनिक इंटेग्लिओ (उत्कीर्ण) प्लेट बनिवण्याच्या तंत्रज्ञानाचे व त्या संबंधिच्या नव्या यंत्राचे उद्घाटन अर्थ मंत्रालयाचे आर्थिक कार्य विभाग सचिव सुभाषचंद्र गर्ग यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारत प्रतिभूमी मुद्रण तथा मुद्रा निर्माण महामंडळ मर्यादीतच्या अध्यक्षा तथा व्यवस्थापकीय संचालिका तृप्ती पी. घोष, संचालक एस. के. सिन्हा, ए. के. श्रीवास्तव, करन्सी नोट प्रेसचे महाप्रबंधक एस. पी. वर्मा, भारत प्रतिभूमी मुद्रणालयाचे महाप्रबंधक सुधीर साहू आदी अधिकारी उपस्थित होते.Inauguration machine computing IntegLio printing press nashik road 

याठिकाणी सुरू करण्यात आलेली ही आधुनिक प्रणाली आशिया खंडातील एकमेव प्रणाली आहे. संगणकाद्वारे अत्याधूनिक तंत्रज्ञान वापरून इंटेग्लिओ प्रिंटीगसाठी लागणारी इंटेग्लिओ प्लेट तयार करण्याची ही उच्च प्रणाली आहे. या प्रणालीचा सर्वप्रथम नाशिक येथे वापर करण्यात येत आहे. ही प्रणाली देशाच्या मुद्रण सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बँक, नोट मु्द्रणाच्या सुरक्षितेत अधिक भर घालणारी आहे.Inauguration machine computing IntegLio printing press nashik road

भेटी दरम्यान गर्ग यांनी नोटमधील विविध उत्पादन विभागांना भेट दिली. यंत्राची सविस्तर माहिती घेतली. तसेच नोट छपाईच्या यंत्राचे अतिशय बारकाईने निरीक्षण केले व सुरक्षा मानकांचीही माहिती त्यांनी याप्रसंगी जाणून घेतली. करेंसी नोट प्रेस जागतिक स्तरावर एक अत्याधुनिक बँक नोट मुद्रणालय म्हणून नावारूपास येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.करन्सी नोट प्रेस नाशिक हे भारतातील पहिले बँक नोट मुद्रणालय असून,त्याचे उद्घाटन सन १९२८ मध्ये झाले. आजपर्यंत भारताच्या चलना व्यतीरिक्त इतरही अनेक देशांचे चलन छापण्यात आले आहे.Inauguration machine computing IntegLio printing press nashik road 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.