नाशिक : प्रतिनिधी Nashik school नाशिक शहरात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन पाचवी ते नववी आणि अकरावीचे वर्ग येत्या १५ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येत आहेत. याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहेत.
सोबतच दहावी आणि बारावीचे केवळ इंग्रजी, गणित, विज्ञान या विषयांसाठी वर्ग सुरू राहातील. परंतु त्यासाठी पालकांची संमती घेणे आवश्यक राहील, असे देखील नमूद करण्यात आले आहे. सोबत ऑनलाईन शिक्षण सुरु राहणार आहे. In Nashik school, if these school classes are closed till this date, then the permission of parents is required for these classesNashik school
राज्यात कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यानंतर शाळांमध्ये साथ प्रतिबंधक उपाययोजना करून शाळा सुरू करण्यात आल्या. मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जावू नये तसेच शाळा बंदचा परीणाम विद्यार्थी आणि पालकांच्या मानसिकतेवर परीणाम होऊ नये याचा विचार करून गेल्या ४ जानेवारी पासून नववी ते बारावीचे वर्ग तर २७ जानेवारीपासून पाचवीचे ते आठवीचे वर्ग सुरू झाले होते.
दरम्यान शहरात कोरोना बाधीतांची संख्या वाढत असल्याने नाशिक महापालिका क्षेत्रातील पाचवी ते नववी आणि अकरावीचे वर्ग १५ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहेत.
मात्र, दहावी आणि बारावीचे केवळ इंग्रजी,गणित विज्ञान या विषयांसाठी सुरू राहातील ,परंतु त्यासाठी पालकांची संमती घेणे आवश्यक राहील, असे देखील नमूद करण्यात आले आहे.Nashik school