मोबाईलच्या माध्यमातून फिल्म मेकिंग सहज शक्य

नाशिककरांना मिळाले मोबाईल फिल्म मेकिंगचे धडे

  मोबाईलच्या माध्यमातून फिल्म मेकिंग सहज शक्य आहे. यासाठी महागडे मोबाईल वापरण्याची मुळीच गरज नसून फक्त मोबाईलची योग्य  हाताळणी आणि बेसिक गोष्टीचा सुयोग्य वापर करण्याची गरज असल्याचे मत प्राध्यापक फैझ उल्ला, सेंटर फॉर द स्टडी ऑफ मिडीया अॅण्ड कल्चर स्टडी, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, मुंबई यांनी व्यक्त केले आहे. अंकुर फिल्म फेस्टीव्हलमध्ये मोबाईल फिल्म मेकिंगची कार्यशाळा संपन्न झाली. त्यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी थेट मोबाईलवर फिल्म मेकिंग आणि त्याचे एडीटींगचे प्रात्यक्षिकही करून दाखवले.

प्राध्यापक फैझ उल्ला, सेंटर फॉर द स्टडी ऑफ मिडीया अॅण्ड कल्चर स्टडी, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स

अभिव्यक्ती, मिडीया फॉर डेव्हलपमेंट, नाशिक आयोजित हॉलमध्ये ६ वा अंकुर फिल्म फेस्टीव्हल कुसुमाग्रज स्मारकात विशाखा आणि स्वगत हॉलमध्ये सुरु आहे. यामध्ये फिल्मच्या सादरीकरणासह मोबाईल फिल्म मेकिंग या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली.सामान्यपणे महागडा मोबाईल म्हणजे चांगले शुटिंग, फोटो असे मानले जाते. मात्र हे अत्यंत चुकीचे आहे. अगदी सात आठ हजार रुपयात येणाऱ्या मोबाईलमध्येही चांगली फिल्म बनते. कारण त्या मोबाईलचा वापर कसा करतो यावर लक्ष द्यायाला हवे असे उल्ला यांनी सांगितले.  साधारपणे मोबाईलवर फिल्म बनवतांना मोबाईल हाताळतांना तो कधीही उभा धरून शूट करू नये, चित्रीकरण करतांना मोबाईल फ्लाईट मोडवर टाकावा, बॅटरी पूर्णपणे भरलेली असावी, मोबाईलमध्ये मेमेरी असली पाहिजे आणि चित्रीकरणाचा बॅंक अप घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

सोबतच चित्रीकरण करतांना ट्रायपॉडचा वापर करावा जेणेकरून दृश्य स्थित टिपली जातील, चित्रीकरणाची वस्तू जवळ ठेवावी यासोबतच लाईट, आवाज या गोष्टीकडे लक्ष द्यावे. विशेष म्हणजे रूम टोन घ्यायला कधीही विसरून नये या टिप्स उल्ला यांनी दिल्या.यावेळी त्यांनी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. सोबतच गुगल मॅप बनवण्याचे धडे ही दिले.

दिनांक २६ रविवारची आकर्षण

 तिसरी कार्यशाळा

वेळ : सकाळी ११ ते ४, ठिकाण : स्वगत हॉल.

विषय : Cinematography.

सादर होणाऱ्या फिल्मस

वेळ : सकाळी१०: ३० वाजेपासून , ठिकाण : विशाखा हॉल.

रसन पिया, छाया, धनुष्कोडी, डेप्थ, देव माणूस, अनुराधा, गोवंडी क्राईम और कॅमेरा, आकर्षण, बुद्धी, डीय- लॉग, गाठ, पहाटेची रात्र, रिअल लव्ह, उत्सव.

फेस्टीव्हलच्या समारोपाचा कार्यक्रम

वेळ: सायंकाळी ५ वाजता, ठिकाण : विशाखा हॉल.

उपस्थित मान्यवर : प्रसिद्ध माहितीपटकार, फरीदा पाशा, प्रसिद्ध माहितीपटकार (MIFF-Golden Conch winner 2016) यांच्या माय नेम ईस सॉल्ट माहितीपटाचे सादरीकरण.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.