‘एक्सक्लेम २०१८’ मध्ये ऐतिहासिक आणि आधुनिकतेचा सुरेख संगम

आयडियाच्या विद्यार्थ्यांनी ‘आधुनिक आर्किटेक्चरच्या शिल्पकारांचे केले स्मरण

प्रदर्शनात साकारल्या हुबेहुबे प्रतिकृती

नाशिक : देशाची आणि संस्कृतीची ओळख इमारतीमधून होत असते. त्यामुळे उत्तम प्रकारच्या वास्तूची निर्मिती करणे गरजेचे आहे. देशामध्ये याआधीही अनेक मानवंत आर्किटेक्ट लोकांनी उत्तम काम केले आहे. त्यांच्या कामातून प्रेरणा घेत लोकपयोगी वास्तू निर्माण केल्या पाहिजे असे मत नाशिकचे प्रसिद्ध  आर्किटेक्ट धनंजय शिंदे यांनी मत व्यक्त केले. आयडीया कॉलेजच्या आर्किटेक्चरची एबीसी अर्थात ‘परिचय’ यावर आधारित ‘एक्सक्लेम २०१८’ वार्षिक प्रदर्शनाचे उद्घाटन धनंजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले . त्यावेळी ते बोलत होते. हे प्रदर्शन येत्या १५ एप्रिल २०१८ पर्यत शहरातील कुसुमाग्रज स्मारक, गंगापूररोड, येथे सर्वासाठी खुले असणार आहे.

विद्यावर्धन ट्रस्ट यांचे इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन इनव्हारमेन्ट अॅण्ड आर्किटेक्चर (Institute for Design Environment and Architecture) अर्थात ‘आयडिया कॉलेज’ नाशिकमध्ये कार्यरत आहे. आधुनिक भारतीय आर्किटेक्चरचे  शिल्पकार म्हणून कै.आर्किटेक्ट अच्युत कानविंदे,  आर्किटेक्ट बाळकृष्णा दोशी आणि कै.आर्किटेक्ट चार्ल्स कोरिया यांना ओळखले जाते. यांच्या कामावर आधारित असलेले आणि त्यांच्या नावाच्या आद्याअक्षराने सुरुवात करत आर्किटेक्चरची एबीसी अर्थात ‘परिचय’ यात ‘आधुनिक भारतीय आर्किटेक्चरची पायाभरणी’ या विषयावर आधारित ‘एक्सक्लेम २०१८’ वार्षिक प्रदर्शला उत्साहात सुरुवात झाली आहे.

या प्रदर्शनात देशातील प्रसिद्ध असलेल्या सोबतच जगात ज्या वास्तूंची स्व:ताची वेगळी ओळख निर्माण केली आहे  अशा इमारतीची प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. यामध्ये अरण्या हौसिंग (निर्माण १९८९) आर्किटेक्ट क्षेत्राला ‘नोबेल’ म्हणून मानला जाणारा ‘प्रिझ्कर आर्किटेक्चर पुरस्कार’ यंदा भारतीय  आर्किटेक्ट बाळकृष्णा दोशी अर्थात बी.वी.दोशी यांना देण्यात आला आहे. इंदौरपासून सुमारे ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या अरण्य हौसिंगच्या उभारणीसाठी दोशी यांना हा पुरस्कार देण्यात आला. याच अरण्य हौसिंगची प्रतिकृती प्रदर्शनात मांडण्यात आली आहे. कमी पैशांमध्ये सर्व सुविधांनी परिपूर्ण अशी ही वसाहती आहे.  गरीब नागरिकांना परवडतील अशी घरांची निर्मिती, कमीत कमी जागेचा  योग्य वापर करत उत्तम असे रहिवासी घरे निर्मिती. या घरांच्या परिसरातच सर्व वस्तू, किराणा, मिळेल अशी सोय तर मुलांसाठी मैदान सुद्धा केलेली आहे.

प्रेमाभाई हॉल (१९७२) हा अहमदाबाद येथे आर्किटेक्ट बी.व्ही. दोशी  यांनी ऐतिहासिक अशी ओळख निर्माण होईल असे भव्य नाट्यगृह  सार्वजनिक सभागृह उभारले आहे. हे सभागृह संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे.

आय.आय.टी. कानपूर (१९६०) ची पी.के. केळकर लायब्ररी कै.आर्किटेक्ट अच्युत कानविंदे यांनी पूर्णपणे वास्तूशास्त्रावर आधारीत असलेल्या या इमारतीच्या भिंती विटाच्या आहेत. इतर बांधकाम सिमेंटचे आहे. दक्षिणेला पाण्याचे मोठे तळे आहे जेणेकरून इमारतमध्ये गारवा कायम राहील. सूर्य प्रकाशासाठी विशिष्ट प्रकारची प्रकाश योजनेची उभारणी करण्यात आली आहे.

पिनॅकल, डक्सटोन – सिंगापूर एआरसी स्टुडियो २००९, या इमारतीस तिच्या विशिष्ठ आकाराबद्दल पुरस्कार मिळाला आहे. ही ७ इमारतींची एक संघ इमारत असून पुलांनी तिला एकमेकांसोबत जोडले आहे. यामध्ये प्रत्येक इमारत ही ५० मजली आहे. संगीताच्या भाषेच्या (नोट्स) मधून प्रेरणा घेतली आहे.जगातील सर्वात मोठा आकात तरंगणारा पूल ही इथेच आहे.

स्काय हॅबिटाट सिंगापूर –  मोशे सफादी २०१५ ही ३८ मजली अशी सोबत बगीचा सुद्धा असलेली इमारत आहे. जुन्या काळातील डोगर दऱ्यातील घरा सारखी यांची निर्मिती आहे. तीन पुलासारखे आकाशातील तरंगते दिसावे अश्या तीन पूलाने यांची जोडणी केली आहे. यामुळे या इमारतीती अंतर्गत रस्ते, बगीचा आणि मोकळ्या अश्या अनेक जागा तयार करण्यात आल्या आहेत.

डब्लू ५७ – मॅनहेटन न्यूयोर्क २०१६, ही ३२ मजली आधुनिक इमारत असून जवळपास ७०९ घरे यात आहेत. या इमरतीचा काही भाग नागरिकांना दिला असून, काही ठिकाणी खासगी उपयोग केला आहे. या इमारतीच्या मध्यभागी बाग तयार केली आहे. तर हडसन नदी दिसू शकले असे बांधकाम आहे.

कॅप्सूल टॉवर (१९७२) टोकियो   जपान येथे आर्किटेक्ट किशो कोरुकावा यांनी उभारली आहे. यात पहिला मजला हा व्यवसायिक कारणासाठी वापरात असून उर्वरित रहिवासी इमारत आहे. या इमारतीत लहान आकाराची १४० घेरे असून ती त्यांच्या जागेवरून काढून सुद्धा टाकता येतात.

द इंटरलास सिंगापूर २०१३  ही ३१ मजली इमरात असून सिंगापूरच्या जुने गावे आणि इमारतीवर आधारित ही इमारत बांधली असून, चौकोनी आकारात सहा समांतर बाजूने जोडणी करण्यात आली आहे.  कोवलम बीच रिसोर्ट ची अंतर्गत सजावट देखील साकारण्यात आली आहे. कै.आर्किटेक्ट चार्ल्स कोरिया यांनी हे काम केलेले आहे.

कांचनजंगा, मुंबई, १९७४, ही इमारत कै.आर्किटेक्ट चार्ल्स यांनी उभारली आहे.ही जगातील सर्वात उंच इमारतीपैकी एक आहे. यात समोरासमोर खिडक्याची बांधणी करण्यात आली असल्यामुळे हवा खेळती राहते.  कोरामंगल बंगलोर,  ही इमारत मुळची कै.आर्किटेक्ट चार्ल्स यांचे घर होते. यात दक्षीणात्य आणि ब्रिटीश  अशा दोन्ही कलांचा सुंदर संगम आहे.

याशिवाय विद्यार्थ्यांनी  कै.आर्किटेक्ट अच्युत कानविंदे, आर्किटेक्ट बाळकृष्णा दोशी आणि कै.आर्किटेक्ट चार्ल्स कोरिया यांच्या कार्यशैलीचे एकत्रिकरण करून एका मॉडेल सुद्धा बनवले आहे. सोबतच कॉलेजमध्ये शिकत असलेल्या विद्याथी वर्गाने एक इमारतीचा विषय घेत त्यावर काम केले आहे. जसे महापालिकेसाठी बाजार, सायन्स सेंटर, बिजनेस सेंटर आणि गरीब लोकांना परवडतील अशी कमी खर्चातील घेरे याबाबत त्यांनी आराखडे तयार केले आहेत.

प्रतिक्रीया

या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना नवीन कल्पनेवर काम करता येते. या क्षेत्रात ज्यांनी उत्तम असे काम केले आहे. त्यांच्या कामातून प्रेरणा घेत विद्यार्थ्यांना भविष्यातील कामात मदत होते. पुस्तकातून शिकत असतांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव त्यांना अधिक घडवतो. त्यामुळे कॉलेजमध्ये नेहमीच असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात.

विजय सोहनी, संचालक , आयडीया कॉलेज, नाशिक.  

आपला Whats App ग्रुप आहे आमचा 8830486650, 9689754878 दोन्ही नंबर सेव करा नाशिकच्या बातम्या मिळावा ! बाजार भाव काय आहे ते रोज मिळवा !

Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा !

Connect With Us : Email : nashikonweb.news@gmail.com

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.