पदाधिकारी-प्रशासन समन्वय ठेवणार; गरज पडल्यास मुंढेंचे निर्णय बदलू- गमे

मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आज अधिकृत असा पदभार स्विकारला आहे. मात्र तो स्विकारताना त्यांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांना समन्वय करणार असे स्पष्ट केले तर तुकारम मुंढे यांचे निर्णय बदलावेसे गरजेचे असेल तर त्यात बदल करू असे देखील गमे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता आधिच चिडलेले नागरिक त्यात गमे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष असून, नागरिक विरुद्ध मनापा आयुक्त असा वाद देखील उभे राहण्याची चिन्हे आहेत. IAS Radhakrush Game take charge nmc coordination between politician and nmc nashik on web 

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारकिर्दीत निर्माण झालेल्या लोकप्रतिनिधी व शासन यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात समन्वय ठेवणार असून, सुयोग्य पद्धतीने  कामकाज करणार आहे, असे सांगत नुतन आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी गुरूवारी दि.६ रोजी पदभार स्विकारला आहे. सोबतच तुकाराम मुंढे यांनी केलेली  लोकपयोगी निर्णय पुढे चालू ठेवले जातील, आणि आवश्यक त्या निर्णयात सुधारणा करण्याची तयारी गमे यांनी बोलून दाखवली आहे.  त्यामुळे मनपात शांतता निर्माण होईल असे चित्र आहे तर नागरिकांना नूतन आयुक्त किती पचनी पडतात हे येत्या काही दिवसता समोर येणार आहे.

फेब्रुवारी महिन्यात तुकाराम मुंढे यांच्या मनपा आयुक्तपदी करत, भाजपा महापौर आणि सर्व लोकप्रतिनिधी यांच्या तीव्र विरोधानंतर नऊ महिन्यात बदली झाली, तर मुंढे आणि नागरिक यांच्या विरुद्ध राजकारणी असे चित्र होते.मुंढे यांची बदली झाली असली तरी ती रद्द करण्यासाठी सुरू असलेले मार्चे, न्यायालयात जनहित दाखल करण्याची तयारी या पार्श्वभूमीवर अखेरीस उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची नियुक्ती झाली आहे.IAS Radhakrush Game take charge nmc coordination between politician and nmc nashik on web 

प्रभारी आयुक्त राधाकृष्णन बी हे केंद्र सरकारच्या वतीने दुष्काळी पहाणी दौऱ्यासाठी वेळ दिला असल्याने गमे यांनी स्वतः औपचारीक कार्यभार स्विकारला आहे.गमे माध्यमांसोबत बोलतांना म्हणाले की, नाशिकमध्ये काम केले आहे, त्यांचा  चांगला अनुभव आहे. सर्वांशी समन्वय साधून काम करण्यात येईल असे त्यांनी आवर्जून  सांगितले आहे. तुकाराम मुंढे यांचे निर्णय रद्द करण्याच्या सत्ताधिका-यांच्या मनोदयाबाबत विचारले असता त्यांनी मुंढे यांनी जनहिताचे जे निर्णय घेतले ते यापुढेही सुरूच राहातील तसेच ज्यात सुधारणा करण्याची गरज आहे, त्यात योग्य ती सुधारणा केली जाईल असे स्पष्ट केले. स्मार्ट सिटीच्या कामकाजाला गती देण्याची देखील तयारी असल्याचे ते म्हणाले आहेत.

IAS Radhakrush Game take charge nmc coordination between politician and nmc nashik on web 
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.