I-Phone Information in marathi आय फोन महाग का ?

आय फोन हा सर्वाधिक लोकप्रिय असा फोन आहे. आपल्या देशात आणि जगात सर्वाधिक विकला जाणारा फोन आहे. मात्र हा फोन जेव्हा बाजारात येतो तेव्हा तो फार महाग असतो, त्यातही आता काही दिवसापूर्वी जे फोन बाजारात आले त्यांची किमत तर लाख रुपयांच्या पुढे आहे. मग आय फोन हा इतका महाग का असतो असा प्रश्न सर्वांना पडतो, त्याच्या तांत्रिक किचकट कारणात न जाता आपण सोप्या भाषेत समाजून घेवू की हा फोन इतका महाग का ?I-Phone Information in marathi

सुरवातीची काही कारणे पुढील प्रमाणे आहेत :

ज्यांच्या कडे आय फोन नाहीत मात्र त्यांची सुद्धा करणे आहेत ती अशी :

१ – न हँग होणारा फोन.
२ – कॅमेरा क्वालिटी व उत्तम दर्जाचा प्रॉडक्ट क्वालिटी
३ – ऍपल चा फोन म्हणजे श्रीमंत असल्याचं दर्शवतो
४ – ऍपल कंपनी चे रेपुटेशन मुळे
५ – कंप्लीट वॉटरप्रूर
६ – ओलेड डिस्प्ले असलेला एकमेव फोन
७ – ३d टच असलेला दिस्पले

आयफोन धारक असलेला व्यक्ती का महाग आहे हे सांगेल

१ – आयफोन हॅक होत नाही त्यामध्ये RAT किंव्हा व्हायरस चालत नाही

२ – फोन मधील डाटा encrypted असतो त्यामुळं फोन चोरी जरी गेला तरी फोन मधील एक फोटो अथवा व्हिडिओ कोणालाच फोन बाहेर काढता येणार नाही जरी ती अमेरिकेतली NSA किंवा FBI असो. आयफोन यूजर ची प्रायव्हसी खूप चांगल्या पद्धतीने सुखरूप ठेवतो.
३ – आयफोन ची आयओएस ही ऑपरेटींग सिस्टीम रॅम वर जास्त लोड आणत नाही आणि गेमिंग खूप स्मूथ चालते.
४ – Oled स्क्रीन मुळे बॅटरी जास्त लवकर कमी होत नाही आणि विशेष म्हणजे ४K HDR ( चित्रपट गृह एवढी क्वालिटी) व्हिडीओ रेकॉर्ड आणि प्लेबॅक खूप स्मुथ आहे.
५ – एकाच वेळेस ७-८ ऍप ओपन ठेवले तरी फोन थोडा सुद्धा हँग होत नाही कारण प्रत्येक ऍप हा आयफोन साठी optimization केलेला असतो.
६ – आयफोन मधील प्रोसेसर ऍपल कंपनी स्वता बनवते आणि ते प्रोसेसर ६४bit चे आहे जे मोबाईल मध्ये प्रथमच ऍपल ने आणले.
७ – ही गोष्ट मात्र खरी आहे आयफोन धारक श्रीमंत वाटतो आणि त्याची एक वेगळी प्रतिष्ठा मिळते.
८. आय फोनचे कॅमेरे हे वेगळे नसून तर ते सोफ्टवेअर बेस आहेत, त्यामुळे त्यांचे कॅमरे आणि त्यातील नवीन गोष्ट फक्त तेच देवू शकतात, इकडे कितीही पिक्सल जरी असले तरी अजूनही आय फोनच्या कॅमेराची बरोबरी इतर फोनला अजूनतरी करता आलेली नाही.
९ . या फोन मध्ये व्हायरस जाणे हे अजूनतरी शक्य नाही त्यामुळे फोन फार सुरुक्षित राहतात.
१0. स्वतंत्र कळफलक नाही: फोन च्या पडद्याला केलेल्या स्पर्शा द्वारे (टच स्क्रीन) फोनचा कळफलक वापरता येतो.
११. या फोनवरुन तुम्ही इमेल वापरू शकता. स्टॉक मार्केट, हवामान आणि युट्युब च्या चलचित्रांबद्दलसुद्धा यावर थेट माहिती मिळू शकते.
१२ . अनेक लोकांच्या मनात आता एक प्रश्न असेल का बरं एवढं महाग फोन घेतात त्यात काहीच डाऊनलोड करता येत नाही , व्हिडिओ डाउनलोड होत नाहीत, प्रत्येक गोष्टीसाठी पैसे लागतात , बल्यूतूथ ने पन काही गाणे व्हिडिओ घेता येत नाही. कॉल रेकॉर्डिंग होत नाही ऍप लॉक नाही. तर आयफोन घेऊन फायदा काय ? तर हा सर्वात मोठा गैर समज आहे.
Jailbreak ही गोष्ट क्वचितच लोकांना माहीत आहे आणि आयफोन मध्ये सर्वकाही करता येतं बस ते करतात कसा हे समजणं कठीण आहे. I-Phone Information in marathi

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “I-Phone Information in marathi आय फोन महाग का ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.