पोलिसांनी पकडला हैद्राबाद येथील सोनसाखळी चोर

नाशिक : नाशिक पोलिसांनी हैद्राबाद येथील एका सोनसाखळी चोराला अटक केली आहे. यामध्ये या लुटारुवर तेलंगाना येथे ५४ गुन्हे दाखल आहे. तर त्याने नाशिक येथे ११ महिलांच्या सोनसाखळ्या लुटल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. यामध्ये पोलिसांनी महम्मद मुजीब अफान बिन याला ताब्यात घेतले आहे. तर त्याच्या दोन साथिदारांनाही गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.

यामध्ये लुटारू असलेल्या महम्मद मुजीब हैदराबाद येथे  गुन्हे करुन  पोलिसांना चकमा देत पळून गेला होता. तर लपण्या साठी तो नाशिकमध्ये दाखल झाला होता. शहरातील महिलांचे मंगळसूत्र लुटल्याच्या घटना वारंवार होत असल्याने पोलिसांच्या कर्तव्यावरच संशय होता. या प्रकरणात पोलिसांनी संपला रचला आणि गुन्हे शाखेच्या युनिट एकने महम्मद मुजीब पकडले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक शहर गुन्हे शाखा क्रमांक एकच्या पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील जुंद्रे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अफान बिन हा हैद्राबादचा अट्टल गुन्हेगार नाशिकमध्ये काहींना हाताशी घेऊन घरफोड्या आणि चेन स्नॅचिंगचे गुन्हे करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो अक्रम अस्लम खान आणि अहमद शेख कादर शेख (दोघे वय ३०, रा. एनडी पटेल रोड, गंजमाळ) यांच्यासह गुन्हे करत असल्याची कबुली दिली.

त्यामुळे पोलीस त्यांचा कसून तपास करत आहेत. त्याच्याकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

चोरीचा माल घेणाऱ्याचाही शोध घेण्यात येत आहे. चोरी केलेल्या इसमाविरुद्ध भादंवि कलम ४११ नुसार कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.