लाखो रुपयांच्या शंभरच्या नोटा ; चार संशयिताना पोलिस कोठडी

नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-१ च्या पथकाने सिडको परिसरातील पाथर्डी फाटा येथे पोलिसांनी १०० रुपयांच्या एक लाख ७० हजार दोनशे रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. मोबाईल आणि गुन्हे करण्यासाठी वापरात असलेली इंडिका गाडी असा 2 लाख ८९ हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यातील चारही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना कोर्टासमोर हजर केले असता त्यांना ६ जुलै २०१७ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिस आयुक्त रविंद्र कुमार सिंघल पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे, सहायक पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, दीपक गिरमे, उपनिरीक्षक भीमराव गायकवाड, सहायक पोलीस उपनिरीक्षक जाकीर शेख, संजय पथक, पोलीस हवालदार संजय मुळक, पोपट करवला, दिलीप मुंढे, आसिफ तांबोळी, संतोष कोरडे, स्वप्निल जुंद्रे, राहुल पालखेड, विशाल कुठे, विशाल देवरे, प्रवीण चव्हाण, मोहन देशमुख, संजय सूर्यवंशी, दिघोळे, रावजी मगर, नीलेश भोईर, गणेश वडजे यांचा समावेश होता.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , सिडको  पाथर्डी फाटा येथे १ जुलै रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास चारचाकी वाहनात (क्रमांक एमएच ०५ एबी ७४०९) चार संशयितांनी बनावट नोटा आणल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट-१ च्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला होता.

यावेळी पोलिसांनी संशयित आरोपी प्रशांत विनायक खरात, कांतीलाल यशवंत मोकाशी, राजेंद्र बन्सीलाल मोकाशी, उत्तम अरुण गोळे(सर्व राहणार शहापूर, जि. ठाणे) यांची चौकशी केली होती. मात्र त्यांना योग्य अशी उत्तरे देता आली नाहीत, त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. यापैकी मुख्य संशयित वाडीवऱ्हे जवळ या वाहनातून उतरून गेल्याने तो फरार आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही. हे अटक केलेले सर्व संशयित त्या फरार असलेल्या व्यक्तीवर गुन्हा केल्याचा दावा करत आहेत. पोलीस त्या फार इसमाचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी गाडीची झाडाझडती घेतल्यानंतर गाडीमध्ये शंभर रुपयांच्या 1702 नोटा (एक लाख 70 हजार दोनशे) बनावट आढळून आल्या आहेत. तर पोलिसांनी  तसेच त्यांच्याकडून विविध कंपन्यांचे मोबाइल, गाडी असा सुमारे दोन लाख 89 हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.