बघा, मतदान कसे करावे – नाशिक महानगरपालिका निवडणूक

मतदान कसे करावे.

चार सदस्यांचा एक प्रभाग अशी रचना झाल्यामुळे मतदान करताना आपण मतदारांना चार सदस्यांना मतदान करावे लागणार आहे हे लक्षात घ्यावे. २०१२ साली झालेल्या निवडणुकीत दोन सदस्यीय प्रभाग रचना होती त्यामुळे एका मतदाराने दोन सदस्यांना मतदान केले होते. यावेळी २०१७ मध्ये मात्र पद्धत तीच असली तरी चार सदस्यांना मतदान करावे लागणार आहे. ते कसे करावे हे समजून सांगण्याचा प्रयत्न यातून आम्ही केला आहे.

यातील महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला चारही जागांसाठी मतदान करावे लागणार आहे. त्याशिवाय तुमची मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही हे लक्षात घ्यावे. एखाद्या विशिष्ट जागेसाठीच्या उमेदवारापैकी एकही उमेदवार पसंत नसेल तर त्यास अशा मतपत्रिकेवर सर्वात शेवटी असलेले NOTA  बटन दाबता येईल.

नाशिक महानगरपालिकेसाठी मतदान करावयाची पध्दती खालील प्रमाणे असेल.
चार सदस्यीय प्रभाग असलेल्या प्रभागात एका मतदाराने चार मते देणे आवश्यक आहे.
तीन सदस्यीय प्रभाग असलेल्या प्रभागात एका मतदाराने तीन मते देणे आवश्यक आहे.
प्रत्येक प्रभागातील सर्व जागांवरील एकूण उमेदवारांच्या संख्येनुसार आवश्यक असलेल्या बॅलेट युनिटवर अनुक्रमे ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ जागेची मतपत्रिका असेल.
मतपत्रिकांचा रंग खालील प्रमाणे असेल.
‘अ’ जागेसाठी पांढरा रंग
‘ब’ जागेसाठी फिका गुलाबी
‘क’ जागेसाठी फिका पिवळा 
‘ड’ जागेसाठी फिका निळा
मतपत्रिकेवर उमेदवाराचे नाव व  चिन्ह असेल.
मतदाराने मतदान करण्याची प्रक्रीया खालील प्रमाणे राहील.
‘अ’ जागे साठीच्या मतपत्रिकेवरील पसंतीच्या (योग्य) उमेदवारासमोरील बटन दाबल्या नंतर लाल दिवा लागल्या नंतर ‘अ’ जागेसाठी मतदान प्रक्रीया पूर्ण होईल.
त्यानंतर ‘ब’ जागेसाठीच्या मतपत्रिकेवरील पसंतीच्या(योग्य) उमेदवारासमोरील बटन दाबल्यानंतर लाल दिवा लागल्यावर ‘ब’ जागेसाठी मतदान प्रक्रीया पूर्ण होईल.
याप्रमाणे उर्वरीत ‘क’ व  ‘ड’ जागेसाठी मतदान प्रक्रीया पूर्ण होईल..
चारही मते दिल्यानंतरच बझर (मोठा बिप) वाजेल, याचा अर्थ तुम्ही चारही जागांसाठी मतदान केलेले असून तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे असे समजावे. विधानसभा आणि लोकसभेच्या वेळी एकाच मत असल्यामुळे एकदा बटन दाबल्यास लगेच बझर वाजत होता मात्र यावेळी चार वोटिंग पूर्ण झाल्यानंतरच बझर वाजणार आहे. त्यामुळे गोंधळ करू नका. वरील माहिती नित वाचल्यास गोंधळ होणार नाही याबाबत खात्री बाळगा.
तसेच एखाद्या मतदारास एखाद्या विशिष्ट जागेसाठीच्या उमेदवारापैकी एकही उमेदवार पसंत नसेल तर त्यास अशा मतपत्रिकेवर सर्वात शेवटी असलेले NOTA  बटन दाबता येईल.
येथे शोधा मतदारयादीत आपले नाव : nmcvotersearch.co.in येथेच तुम्हाला मतदार यादी क्रमांक अनुक्रमांक, मतदानकेंद्र, विभाग अशी पूर्ण माहिती एकाच ठिकाणी मिलेले. तेथे आलेली माहिती स्लीप वर असते त्यामुळे मतदार स्लीप मिळाली नाही तरी तुम्ही मतदान केंद्रावर जाऊ शकता.
ओळखपत्र : मतदानासाठी जाताना आपले के ओळखपत्र सोबत ठेवा जसे की, मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, पनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किवा निवडणूक आयोगाने विहित केलेल्या कोणत्याही ओळखपत्रांपैकी एक चालेल.
आपण दिव्यांग आहात? किवा आपल्या ओळखीतील कोणी दिव्यान्गाला मतदान करावयाचे असल्यास आपण याबाबत मतदान अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मदत मिळवू शकता.
त्याचप्रमाणे मतदानास येण्यासाठी कोणी मोफत वाहतूक करण्याचे आमिष दाखवले तर तुम्ही याबाबत तक्रार करू शकता कारण असे करणे हा गुन्हा आहे. याकरिता सावधानता बाळगा.
बघा व्हिडीओ
हा व्हिडीओ ठाणे महानगर पालिकेचा असला तरी नाशिक साठी याच पद्धतीचा अवलंब करावयाचा आहे.
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.