महामार्ग ओलांडताना वाहनाच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू, तिघे जखमी, एक गंभीर

नाशिक : भुजबळ फार्म येथे महामार्ग ओलांडताना एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे एका महिलेसह तिच्या चार वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आज बुधवारी (दि. 29) सायंकाळी पावणेआठ वाजेच्या दरम्यान घडलेल्या या घटनेत सोबत असलेले अन्य तिघे ही जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. highway crossing accident caused two dead bhujbal farm nashik news

यावेळी काहीवेळे साठी झालेली वाहतूक कोंडी

पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, भुजबळ फार्म परिसरात महामार्गाच्या इंदिरा नगरच्या बाजूने असणाऱ्या सर्व्हिस रोड वर शीतल आशिष तांबट (30), कुणाल आशिष तांबट (4), सुभाष चुन्नीलाल तांबट (55), भटूलाल लालचंद कासार (70), यशोदा भटूलाल कासार (65) हे रिक्षातून प्रवासकरून उतरले.

पलीकडे जाण्यासाठी महामार्ग ओलांडताना वेगाने येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली असता शीतल तांबट आणि त्यांचा मुलगा कुणाल जागीच ठार झाले. तर अन्य तिघे जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. highway crossing accident caused two dead bhujbal farm nashik news

भुजबळ फार्म तसेच स्टेट बँक चौक येथील चुकीच्या नियोजनामुळे अनेक नाशिककर आपला जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडण्याचे दिव्य पार पाडतात. येथील नियोजन होणे गरजेचे असून त्याचबरोबर नागरिकांनी रिक्षाने प्रवास करत असल्यास आपल्याला उतरायचे असेल त्याच बाजूने रिक्षा टाकण्यास सांगणे जरुरीचे आहे.

highway crossing accident caused two dead bhujbal farm nashik news

इतर महत्वाच्या बातम्या

राफेलचा करार रिलायन्सशी कसा? सरकारने चौकशी करावी : नाशिकमध्ये काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी

आयुक्त तुकाराम मुंढे माध्यमांसमोर कसे?? कार्यकर्त्याची राज्य सचिवांकडे लेखी तक्रार

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.