राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना जामीन मंजूर, मुंबई सह नाशिकमध्ये जल्लोष

मुंबई :राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना जामीन मंजूर कऱण्यात आला आहे. भुजबळांना २ वर्षानंतर जामीन मंजूर झाला आहे, छगन भुजबळ यांचा बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी १४ मार्च २०१६ पासून – २ वर्षापासून मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये मुक्काम होता.मुंबई उच्च न्यायालयाकडून भुजबळांचं वय लक्षात घेत  जामीन मंजूर केला. भुजबळांना 5 लाखांचा जामीन मंजूर झाला. बोलावतील तेव्हा चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहणं, साक्षीदारांना प्रभावित न करणं, या अटींवर छगन भुजबळांना जामीन मंजूर झाला.न्यायमूर्ती पी. एन. देशमुख यांच्या खंडपीठासमोर या अर्जावर सुनावणी घेण्यात आली. तेव्हा दोन वर्षांहून अधिक काळापासून आपण तुरुंगात आहोत, आपले वय आता 71 वर्षे झाले आहे, त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन आपली जामीनावर सुटका करावी, अशी विनंती त्यांनी हायकोर्टात केली होती.छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी जामीनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. पण सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्याने त्यांनीही हायकोर्टात धाव घेतली आहे.high court granted bail NCP leader Chhagan Bhujbal nashik

छगन भुजबळ यांनी 2 एप्रिल रोजी पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज केला होता. या जामीन अर्जावर काल सुनावणी पूर्ण झाली. त्यानंतर आज मुंबई उच्च न्या्यालयाने त्यांना जामीन मंजूर झाला.दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी मनी लाँडरिंग कायद्याखाली छगन भुजबळ सध्या अटकेत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए कायद्याचे 45(1) हे कलम नुकतेच रद्द केले आहे. त्याचा फायदा घेत आपली जामीनावर मुक्तता करावी, अशी भुजबळ यांची मागणी आहे.

छगन भुजबळ तरूंगात असताना राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी देखील त्यांची भेट घेतली होती. छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. अनेक दिवसापासून छगन भुजबळ यांनी जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते, मात्र सतत त्यांना जामीन नाकारला जात होता, छगन भुजबळ यांची प्रकृती तुरूंगात सतत ढासळत असल्याची तक्रार देखील होत होती. छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला आहे. छगन भुजबळ हे आज जेलची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बाहेर येऊ शकतील. १४ मार्च २०१६ पासून छगन भुजबळ तुरूंगात आहेत.

छगन भुजबळ यांना मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. मनी लॉन्डिंग प्रकरणी छगन भुजबळ तुरूंगात होते, नाशिक आणि येवल्यात छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्यानंतर जल्लोष सुरू झाला आहे.

Advertise With us, Connect with Us on Whats App :  8830486650, 9689754878 (Save This Number and send Hi,Your Name, City  or Subscribe and get added into Our Broadcast list. Get daily newsletters).

Like NashikOnWeb’s Facebook Page : https://www.facebook.com/NashikOnWeb

Follow Us On Twitter : https://www.twitter.com/NashikOnWeb

Follow Us On Instagram : https://www.instagram.com/nashikonweb/

आमच्या सोबत काम करायचे आहे, माहिती द्यायची आहे वरील दोन्ही नंबर आणि खालील इमेलवर लगेच इमेल करा ! NashikOnWeb.news@gmail.com

 

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.