हाय अलर्ट! : तपासणी अंती देवळाली स्थानकासमोर बेवारस बॅगेत सापडले कपडेलत्ते

देवळाली कॅम्प रेल्वे स्थानकासमोर आर्मी रेस्ट हाउस परिसरात कचराकुंडीत मिळून आलेल्या बॅग मुळे खळबळ उडाली होती. तत्काळ बॉम्ब शोधक नाशक पथकाकडून रेल्वे स्थानकाचा परिसर श्वानांच्या सहाय्याने तपासण्यात आला. या बेवारस बॅगमध्ये कपडे आणि कागदपत्रे सापडल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. High alert suspicious deolali camp nashik road railway station

कालच देवळाली कॅम्प स्टेशन उडवून देण्याची धमकी देणारे पत्र मिळून आले होते. यामुळे देवळाली सह नाशिकरोड स्टेशनवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिकरोड भागात मध्यवर्ती कारागृह, नोटांचा प्रेस, आर्टिलरी सेंटर, विभागीय महसूल आयुक्त कार्यालय हे महत्त्वाची कार्यालये आहेत. या ठिकाणी सुरक्षा वाढविण्यात यावी अशी सूचना आहेत.

देवळाली कॅम्पच्या रेल्वेस्थानकावर नेहमीच सुरक्षा रक्षक असतात. तरीही खबररदारी म्हणून मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
#NashikOnWeb

High alert suspicious deolali camp nashik road railway station
Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.