१३ मे पासून शहरात हेल्मेट सक्ती; CP नांगरे पाटील यांचा कोल्हापूर पॅटर्न गाजणार!

कडक धोरण अपघातास कारणीभूत ठरले तर मनुष्य वधाचा गुन्हा

नाशिक : नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांची धरपकड करून शांतता राखण्यास यशस्वी होताना नागरी सुरक्षेच्या धोरणाकडेही जातीने लक्ष घातले आहे. शहरात हेल्मेट सक्तीवरून कडक धोरण अवलंबविण्याचे नाशिक पोलिसांनी ठरविले असून नांगरे पाटील यांच्या कोल्हापूरमध्ये केलेल्या हेल्मेट/सीटबेल्ट सक्तीची आठवण या निमित्ताने होणार आहे. आज (दि. ३) झालेल्या पत्रकार परिषदेत याविषयी निर्देश नांगरे पाटील यांनी दिले आहेत. helmet seat belt compulsion nashik cp

नाशिक शहरात मध्ये २०१८ आणि २०१९ या वर्षभरात झालेले छोटेमोठे अपघात, अपघांतांचे प्रमाण कमी दिसत असले तरी या वर्षी जानेवारीपासून एप्रिल महिना अखेरपर्यंत ५९ अपघातांमध्ये ६३ नागरिकांचा रस्ते अपघातांत मृत्यू झाला. म्हणजेच एक दिवसाआड एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू होत असल्याचे दिसून येते आहे. या कारणामुळे रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी शहर पोलिसांकडून काटेकोर उपाययोजना सुरू करण्यात येणार आहेत.

आता जर वाहतूक नियमांचे उल्लंघन केले आणि अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या वाहन व चालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे, याबद्दलची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पोलीस आयुक्तालयात शुक्रवारी (दि.३) झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

या निमित्ताने मात्र नांगरे पाटील यांनी कोल्हापूर विभागाचे अधीक्षक पदी असताना केलेल्या हेल्मेट सक्तीची आठवण होणार आहे. यात नांगरे पाटील यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी पंगा घेतला होता. प्रचंड विरोध होऊनही नांगरे पाटील यांनी जोरदार कारवाई करत आपला हिसका दाखवला होता. आता नाशिकमध्ये कोण राजकीय विरोध करतो आणि पाटील कोणाला शिंगावर घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

रस्त्यावर हेल्मेटशिवाय दुचाकी वाहन चालविणे, सीटबेल्टचा वापर न करणे, वाहतूक नियम तोडणे यामुळे अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. या सर्व वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अपघात झाला तर संबंधित चालकावरच सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत असे विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले आहे.

नाशिककरांना नियम अभ्यासण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी

सोबतच वाहतूक नियमांची जनजागृती, हेल्मेट सक्तीबाबत १३ मे पासून विशेष मोहीम राबविली जाणार आहे. येत्या दहा दिवसांच्या कालावधीत नागरिकांनी हेल्मेट उपलब्ध व इतर नियम अभ्यासून घ्यावेत. यानंतर मात्र थेट कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही यावेळी नांगरे पाटील यांनी दिला आहे.

त्यानंतर १३ मे पासून वाहतूक पोलीस विभाग व सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी आणि कर्मचारी संयुक्तपणे एकाच वेळी कारवाई ही करणार आहेत. सोबतच पोलिस विनापरवाना वाहन चालवणे, मद्यप्राशन करून वाहन चालवणे, वन वे तसेचे उलट दिशेने वाहन चालवणे, ट्रिपल शीट, क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी, ओव्हरलोड वाहने यांच्यावर नियमांचे उल्लंघन केल्यास थेट कारवाई होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे शहरातील नागरिक आता हेल्मेट सक्ती बाबत कोणती भूमिका घेतात हे लवकरच कळणार आहे.

डॉ. सिंगलही होते हेल्मेट सक्ती बाबत आग्रही

नाशिकचे आधीचे आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल हे देखील हेल्मेट सक्तीबद्दल आग्रही होते. गुन्हेगारांना पकडण्याऐवजी हेल्मेट शक्तीवर कारवाई आणि दंडवसुलीबाबत नाशिककरांनी त्यांच्यावर प्रचंड टीकाही केली. मात्र या हेल्मेट सक्तीचे सकारात्मक परिमाण दिसून आले आहेत. सिग्नलवर थांबून हेल्मेट घातलेल्या दुचाकी धारकांचे/ सीटबेल्ट घातलेल्या चारचाकी धारकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यासह हेल्मेट नसलेल्यांची कानउघाडणीही केली जात होती. त्यांच्या या उपक्रमाचे मात्र नाशिककरांनी कौतुकही केले होते. आता नांगरे पाटील कोणत्या प्रकारे हा उपक्रम राबवितात हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

helmet seat belt compulsion nashik cp

Share this with your friends and family

You May Also Like

One thought on “१३ मे पासून शहरात हेल्मेट सक्ती; CP नांगरे पाटील यांचा कोल्हापूर पॅटर्न गाजणार!

 1. चला, आपण या माझ्या FB page वरील पोस्ट मधील कुत्र्यांच्या व्हिडीओ प्रमाणे आपल्या कुटुंबाची अशी काळजी घेनं तर सोडा पण स्वत: ची तरी येत्या १३ मे पासुन हेलमेट घालुन काळजी घेऊया 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
  आणी आपल्या जीवाची आपल्या पेक्षा जास्त काळजी करणारे आपले मा. पोलीस आयुक्त श्री. विष्वास नागरे पाटील याची मोहीम सफल करुया…..
  नाहीतर जा आंदोलन करायला…
  आपला मनोज जगताप
  “वाईन मित्र”
  http://nashikonweb.com/helmet-seat-belt-compulsion-nashik-cp-vishwas-nangare-patil-kolhapur-pattern/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.