शहरात हेल्मेट सक्तीची आजपासून (13मे) अंमलबजावणी; मूळ कागदपत्रे घेऊनच बाहेर पडा

नाशिक : नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि सर्व 13 पोलीस ठाण्यांच्यातर्फे शहरात हेल्मेट सक्ती/ सीटबेल्ट सक्तीची विशेष संयुक्त मोहीम राबविण्यात येणार आहे. आज सोमवार (दि. 13मे) पासून याची अंमलबजावणी होणार असल्याचे शाखेतर्फे कळविण्यात आले आहे. Helmet seat belt compulsion implementation 13 may Nashik traffic police

का आहे मोहीम?

दोन आठवड्यापूर्वी शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील पत्रकार परिषद घेत सदर बाब स्पष्ट केली होती. शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत 2019 च्या प्रथम 4 महिन्यात दुचाकी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत अधिक आढळून आली आहे. तसेच बेशिस्त वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी हा निर्णय घेतल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले होते.

अशी होणार मोहिमेची अंमलबजावणी :

सोमवारी सकाळी नऊ वाजेपासून शहरातील तेरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदीचे प्रत्येकी तीन याप्रमाणे एकूण 39 नाके निश्चित करण्यात आले आहेत. या 39 नाक्यांवर झीगझँग पद्धतीने बेरिकेड्स लावून हेल्मेट न परिधान करता दुचाकी चालविणाऱ्यांसह सीटबेल्ट न वापरणा-या मोटारचालकांची धरपकड करून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. मात्र ही मोहीम किती दिवस सुरू राहणार हे मात्र स्पष्ट झालेले नाही.

या ठिकाणी असणार नाकाबंदी (चेकपॉइंट्स) :

यानुसार एका पोलीस ठाण्याला प्रत्येकी ३० कर्मचारी आणि १० वाहतूक पोलीसांचा बंदोबस्त असणार आहे. असे एकूण 520 पोलीस या मोहिमेसाठी एकाचवेळी तैनात राहणार आहेत.

ही मोहीम सकाळी साडेनऊ ते दुपारी एक अशी केवळ केवळ साडेचार तास चालणार असल्याची माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक आयुक्त अशोक नखाते यांनी दिली आहे.

काय होणार कारवाई?

या मोहिमेअंतर्गत थेट कारवाई करण्यात येणार असून थेट वाहन जप्तीची कारवाई होणार आहे. त्यासाठी सर्व मूळ कागदपत्रे घेऊन बाहेर पडा असा सल्ला देण्यात आला आहे.

सोशल मीडियावर या हेल्मेट सक्तीच्या कारवाईची खूप चर्चा रंगली असून याचा परिणाम होऊन नाशिककर आजपासून कशाप्रकारे प्रतिसाद देतात ते बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Helmet seat belt compulsion implementation 13 may Nashik traffic police

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.