HAL Spy arrested Nashik एचएएलमध्ये पाकिस्तानची हेरगिरी; एकास अटक; महाराष्ट्र एटीएसची कारवाई

महाराष्ट्र एटीएसची कारवाई

मुंबई/नाशिक : नाशिक जवळ ओझर येथे स्थित असलेल्या विमान बनवणाऱ्या एचएएल मधील एका कर्मचाऱ्यास पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयला गोपनीय माहिती पुरवत असल्याच्या संशयावरून नाशिक येथून अटक करण्यात आली आहे. दीपक शिरसाठ (वय ४१) असं या आरोपीचे नाव आहे. HAL Spy arrested Nashik

ओझरच्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या विमान कंपनीत हा तरूण कार्यरत होता. भारतीय बनावटीच्या विमानांची, विमानातील संवेदनशील तांत्रिक तपशील, हिंदुस्थान एरोनॉटिक्स कंपनीच्या नाशिक येथील कारखान्यातील प्रतिबंधित क्षेत्राची माहिती हा कर्मचारी आयएसआय या संघटनेला पाठवत होता.

हा कर्मचारी पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संघटनेच्या संपर्कात असून तो सर्व गोपनिय माहिती या संघटनेस पुरवत होता.

त्याच्याविरुद्ध कलम ३, ४ आणि ५ शासकिय गुपित अधिनियम १९२३ अन्वये गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.

त्याच्याकडून ३ मोबाईल, ५ सिमकार्ड, दोन मेमरी कार्ड जप्त करण्यात आले असून फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी येथे विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहे. या आरोपी कर्मचाऱ्याला दहा दिवसांची पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे. HAL Spy arrested Nashik

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.