समृद्धी महामार्ग संदर्भात पालकमंत्री महाजन घालणार लक्ष

समृध्दी महामार्ग संदर्भात इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी नाशिकचे पालकमंत्री तथा जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांची गुरुवारी (दि.१४) भेट घेतली. यावेळी महाजन यांनी येत्या काही दिवसात समृद्धी च्या विषयातील सर्व मुख्य अधिकारी, जिल्हाधिकारी, कृती समिती, बाधित शेतकरी यांची बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

भारतीय जनता पक्षाचे नेते तथा नाशिक महानगरपालिकेचे सभागृह नेते दिनकर (अण्णा) पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने ही भेट घेतली. या ऐटीत महाजन यांनी समृद्धी महामार्ग संदर्भात सर्व शेतकऱ्यांचे म्हणने विस्तृतपणे समजून घेतले व तत्काळ नाशिक जिल्हाधिकारी, समृद्धीचे मुख्य अधिकारी यांचेशी फोन वरून चर्चा करून माहिती घेतली.

samruddhi palakmantri mahajan dinkar patil bjp nashik 2

येत्या काही दिवसात समृद्धीच्या विषयातील सर्व मुख्य अधिकारी, जिल्हाधिकारी, कृती समिती, बाधित शेतकरी यांची बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले.

यावेळी नाशिक जिल्हा समृद्धी महामार्ग कृती समितीचे अध्यक्ष कचरू पाटील डुकरे, भाजपचे नाशिक महानगर उपाध्यक्ष अनिल भालेराव, मधुकर कोकणे, भास्कर गुंजाळ, अरुण गायकर, पांडुरंग वारुंगसे, किसनराव वाकचौरे, दौलतराव दुभाषे, ज्ञानेश्वर कडू, रतन पाटील लंगडे, मच्छीन्द्र भगत, आनंदराव वाघचौरे, रघुनाथ वाघचौरे, मल्हारी मांडवे, रामेश्वर शिंदे, एकनाथ पुंडे, रामदास जुंद्रे, रमेश सारूक्ते, ईश्वर रुंगटे, वसंत भोसले, कचरू दौंडे, नारायण मालपाणी, ललित पारख, बाळासाहेब कडू, गुलाब कडू आदिंसह शेतकरी उपस्थित होते.

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.