Guardian Minister Chhaan Bhujbal छगन भुजबळ नाशिकचे पालकमंत्री; भुसेंकडे पालघरची जबाबदारी

Guardian Minister Chhaan Bhujbal

नाशिक जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्रीपदे मिळाल्याने राज्यातील नाशिकचे राजकीय वजन नक्कीच वाढले आहे. मात्र नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार! छगन भुजबळ की कृषी मंत्री पदाची माळ गळ्यात पडलेले दादा भुसे यांच्याकडे जबाबदारी येणार याबाबत जिल्हाभरात उत्सुकता होती. मात्र नुकत्याच मुख्यमंत्री सचिवालयातर्फे जाहीर करण्यात आलेल्या यादीत नाशिकच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नामदार छगन भुजबळ यांची वर्णी लागली असून दादा भुसे यांच्याकडे पालघर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील राजकारणात भुजबळांचा वरचष्मा असेल हे स्पष्ट झाले आहे. दादा भुसेंकडे जबाबदारी गेलेल्या पालघर जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व आल्याचे दिसते.

अशी आहे राज्यातील जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची यादी

पुणे– श्री. अजित अनंतराव पवार

मुंबई शहर– श्री. अस्लम रमजान अली शेख

मुंबई उपनगर– श्री. आदित्य उद्धव ठाकरे

ठाणे– श्री. एकनाथ संभाजी शिंदे

रायगड – श्रीमती आदिती सुनिल तटकरे

रत्नागिरी– ॲड. अनिल दत्तात्रय परब

सिंधुदुर्ग– श्री. उदय रविंद्र सामंत

पालघर– श्री. दादाजी दगडू भुसे

नाशिक– श्री. छगन चंद्रकांत भुजबळ

धुळे– श्री. अब्दुल नबी सत्तार

नंदुरबार– ॲड. के.सी. पाडवी

जळगाव– श्री. गुलाबराव रघुनाथ पाटील

अहमदनगर– श्री. हसन मियालाल मुश्रीफ

सातारा– श्री. शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील

सांगली– श्री. जयंत राजाराम पाटील

सोलापूर– श्री. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील

कोल्हापूर– श्री. विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात

औरंगाबाद– श्री. सुभाष राजाराम देसाई

जालना– श्री. राजेश अंकुशराव टोपे

परभणी– श्री. नवाब मोहम्मद इस्लाम मलिक

हिंगोली– श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड

बीड– श्री. धनंजय पंडितराव मुंडे

नांदेड– श्री. अशोक शंकरराव चव्हाण

उस्मानाबाद– श्री. शंकरराव यशवंतराव गडाख

लातूर– श्री. अमित विलासराव देशमुख

अमरावती– ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)

अकोला– श्री. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू

वाशिम– श्री. शंभुराज शिवाजीराव देसाई

बुलढाणा– डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे

यवतमाळ– श्री. संजय दुलीचंद राठोड

नागपूर– डॉ. नितीन काशिनाथ राऊत

वर्धा– श्री. सुनिल छत्रपाल केदार

भंडारा– श्री. सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील

गोंदिया– श्री. अनिल वसंतराव देशमुख

चंद्रपूर– श्री. विजय नामदेवराव वडेट्टीवार

गडचिरोली– श्री. एकनाथ संभाजी शिंदे

Guardian Minister Chhaan Bhujbal

छगन भुजबळ नाशिकचे पालकमंत्री; भुसेंकडे पालघरची जबाबदारी

Share this with your friends and family

You May Also Like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: तूर्तास तुम्ही हा मजकूर कॉपी करू शकत नाही. क्षमस्व.